घरातच पठण केली ईदची नमाज
खूलताबाद । वार्ताहर
शासनाच्या लॉकडाऊन या निर्णयाचे पालन करीत खुलताबाद येथील मुस्लिम धर्मियांनी ईदची नमाज सामुहिक रित्या पठण न करुन आप आपल्या घरातच नमाज पठण करुन ईद साजरी केली. कोरोना सारख्या महाभयंकर आणि महाविणाशक जिवघेण्या विषाणूने अख्ख्या जगाला आपल्या विळख्यात घेऊन मानव जिवनाला घरातच कैद केले असल्याने मानवी जीवनाचा चक्का अगदी जाम झाला असल्याने जिवनाची गति स्थितिर झाली आहे.
या जिवघेण्या रोगावर अद्यापपर्यंत तरी औषध निघाले नसल्याने या विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन हा निर्णय अगदी योग्य आणि महत्वपूर्ण घेतला असल्याने याचा फायदा चांगल्या प्रकारे दिसुन येत आहे. लॉकडाऊनमध्ये प्रार्थनास्थळे, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आदिसुध्दा बंद करण्यात आली आसल्याने कोणत्याही धार्मिक कींवा सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा बंद असल्याने प्रत्येक सनवार, जयंत्या नागरीकांनी घरातच साजरे करून शासनाच्या लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला आहे. या लॉकडाऊनमध्ये मुस्लिम धर्मियांचा रमज़ान हा पवित्र उपवासाचा महिना आला असल्याने खुलताबाद येथील मुस्लिम धर्मियांनी शासनाच्या लॉकडाऊन या निर्णयाला महीना भर उत्तम प्रतिसाद दिला असुन आपली महीना भर चालनारी रात्रिची सर्वात मोठी आणि पुण्य समजनारी तरावी ही नमाज प्रार्थनास्थळावर पठण न करता घरातच पठण करुन शासनाच्या निर्णयाचा आदर करुन उत्तम प्रतिसाद देउन कायद्याचे पालन केले. आणि महिनाअखेर असनारा मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा समजनारा सन रमज़ान ईदची नमाज सुध्दा सामुहिक रित्या पठण न करता आप आपल्या घरातच नमाज पठण करुन ईद साजरी केली.
Leave a comment