मद्यविक्री दुकानांचा फोटो अन् फसवे मोबाईल नंबर फेसबुक पेजवरील जाहिरातींपासून सावधान
औरंगाबाद । उमेश पठाडे
मदिरा अर्थातच दारू किंवा अल्कोहल हे अगदी प्राचीन काळापासून जीवनातील मनोरंजन, विरंगुळा ,शौक इत्यादी साठी वापरली जाते. दारू बनवण्याचे अनेक निरनिराळे प्रकार व पद्धती विविध संस्कृतींमध्ये अवलंबल्या गेले आहेत. सध्या लाँकडाऊनच्या काळामध्ये दारू विक्रीवर बंदी घातली गेल्यानंतर अनेक मद्य प्रेमी अगदी चढ्या भावाने सुद्धा दारू खरेदी करण्यासाठी मागेपुढे पाहत नव्हते. जेव्हा लाँकडाऊनमध्ये दारू विक्री सुरू झाली तेव्हा दारू खरेदीसाठी लांबच लांब रांग लागल्या .यावर दारू विक्री व्यवसाय हा महसुलाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे अशी भलावण केली गेल्यामुळे अनेक जोक व मिम्स सुद्धा व्हायरल झाले. मद्यपींसाठी दारू ही एक कळीचा मुद्दा असते हे यावरून सिद्ध झाले .दारूचे सुद्धा अनेक प्रकार असतात ते कधीकधी त्यांच्या किमती वरून सुद्धा निश्चित होतात. काही प्रकारच्या दारू या अगदी सहज पणे बाजारात उपलब्ध असतात व त्यांच्या किमती सुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्यात असतात मात्र दारू च्या एका बाटलीची किंमत लाखोंच्या घरात असलेल्या सुद्धा दारुच्या बाटल्या आहेत महागड्या दारू पिणारे लोक सुद्धा
करोनाचे रुग्ण वाढल्याने सध्या औरंगाबाद शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गेल्या 10 एप्रिलपासून शहर पूर्णपणे बंद असल्याने तळीरामांची अडचण झाली आहे. काय करावे हा प्रश्न मद्यपींना पडलेला असताना औरंगाबाद शहरात सोशल मिडीयावर आलेली जाहिरात पाहून थोड्या वेळासाठी सुखावलेल्या तळीरामांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील विविध नामांकित असलेल्या वाईन शॉपी चे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट खोलून भामट्याने मद्यपींना ऑनलाईन घरपोच दारू देण्याचे अतिष दाखवून ऑनलाइन फसवणूक सुरू केली आहे.
22 मार्चचा जनता कर्फ्यू झाल्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. सध्या हॉस्पिटल, मेडिकल, दूध व भाजीपाला वगळता अन्य खरेदी - विक्री बंद करण्यात आली आहे. यामध्ये बिअरबार, परमिट रुम, वाईन शॉपचा समावेश आहे. दररोज मद्य पिणार्यांची सध्या पुरती पंचायत झाली आहे. सुरुवातीच्या काळात काही दिवस कशीबशी गरज भागवली. दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे देऊन तळीरामांनी आपली गरज भागवली. केंद्र शासनाने पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ ते 30 मे पर्यंत केली आहे. बाहेर पडावे तर पोलीस पकडतात, चोरट्या मार्गाने कुठे मिळेल का याची चौकशी करून मद्यपी घरात शांत बसत आहेत. अशा स्थितीत फेसबुक सर्च करताना मद्यांच्या बाटल्या दाखवून होम डिलेव्हरी करणार्या जाहिराती पाहावयास मिळत आहेत.
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून औरंगाबाद शहरातील नामांकित विविध असलेल्या वाईन शॉपीच्या नावाने फेसबुकवर दुकानाचे नाव टाकून वाईन होम डिलेव्हरी’ या नावाने बनावट अकाऊंट सुरू करून मद्यविक्री दुकानांच्या फोटोसह फसवे मोबाइल नंबर फेसबुकवर टाकून मद्यपींना फसवले जात आहे. 5 ते 6 फोटो व मोबाइल क्रमांकासह फेसबुक पेज आहे. त्यामुळे जनसामान्यांनाही हे फेसबुक पेज खरेच असावे, असा भ्रमही निर्माण होतो. शहरातील अनेक तरूण ही जाहिरात पाहून मद्यासाठी आसुसलेली मंडळी फेसबुकवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करीत आहेत. संपर्क केल्यानंतर मोबाईलवरील व्यक्ती कोणता ब्रँड हवा आहे? अशी विचारणा करतो. संपर्क करणार्या व्यक्तीने ब्रँड सांगितल्यानंतर त्याची किंमत सांगितली जाते. मद्यपी जास्तीत जास्त मालाची मागणी करतो, तेव्हा त्याला पैसे गुगल पे वरून भरण्यास सांगितले जातात. काही झालं तरी दारू मिळाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मद्यपी गुगल पे व अन्य ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवतात. पैसे मिळाल्यानंतर देण्यात आलेला मोबाईल नंबर बंद केला जातो. अशा पद्धतीने सध्या तळीरामांची ऑनलाईन फसवणूक होत आहे.
Leave a comment