बसने 3500 मजूर राज्याच्या सिमेवर पोहचवले
औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना ससंर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे जिल्ह्यात अनेक परराज्यातील मजूर, परप्रांतीयाना आपल्या गावी जाणे शक्य नव्हते. त्यांना आपल्या स्वगृही जाण्यासाठी शासनाने काही अटी नियमांच्या अधीन परवानगी देऊन जिल्हा प्रशासनामार्फत त्या लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले.त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार राज्यातील मजूरांना रेल्वे सुविधा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेची सुरुवात सात मे रोजी भोपाळ साठी पहिल्या रेल्वेने झाली.त्यानंतर आठ मे जबलपूर तर नऊ मे रोजी खांडवा, मध्यप्रदेशसाठीच्या रेल्वे रवाना झाल्या. मध्य प्रदेश शासनाने मध्यप्रदेश मजुरांच्या प्रवासाचा खर्च भरलेला आहे. सर्वसाधारणपणे मध्यप्रदेश मध्ये साडेतीन हजार मजुरांना रेल्वेद्वारे पोहोचवण्यात आलेले आहे.
औरंगाबादहून उत्तर प्रदेश मधील 8000 मजुरांना आपल्या स्वगृही पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करून या मजूरांना उत्तर प्रदेश मध्ये जाण्यासाठी मदत केली आहे.त्यांतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून तेरा मे रोजी औरंगाबाद ते बालिया आणि औरंगाबाद ते गोरखपूर या दोन रेल्वे पाठविण्यात आल्या.तर चौदा मे रोजी औरंगाबाद ते उन्नाव आणि औरंगाबाद ते आग्रा या दोन ठिकाणांसाठी तर सोळा मे रोजी औरंगाबाद ते लखनौ या रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.झारखंडसाठी 19 मे रोजी औरंगाबाद ते डालटन गंज या ठिकाणासाठी रेल्वे सोडण्यात आली. औरंगाबादहून जाणार्या सर्व मजूरांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे . तसेच सर्व मजुरांना मास्क व अन्नाची पाकीटे व पाण्याची बाटली रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून येत्या 22 मे रोजी बिहारच्या अॅरीयासाठी तर 23 मे रोजी मुझ्जफरपूर साठी रेल्वे रवाना होणार आहेत. बिहार व झारखंड येथील मजुरांचा प्रवासखर्च जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.सर्वसाधारणपणे साडेतीन हजार मजूर रेल्वेद्वारे प्रवास करतील अशी माहिती अप्पासाहेब शिंदे ,उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी यांनी दिली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यान्नोबा बाणापुरे,उपविभागीय अधिकारी औरंगाबाद, किशोर देशमुख, अप्पर तहसीलदार,औरंगाबाद , कृष्णा कानगुले तहसीलदार, औरंगाबाद व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या सर्व टीमने ही कार्यवाही मुदतीत यशस्वीरित्या पार पाडत आहेत.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचा विशेष सक्रिय सहभाग
परराज्यातील जिल्ह्याबाहेरील व्यक्तिंना आपापल्या गावी सोडण्यासाठीच्या उपक्रमात जिल्हा प्रशासनाला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणा भरीव योगदान देत आहे.पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांचे सुचनेनुसार पोलीस निरीक्षक गिता बागवडे, सायबर पोलीस ठाणे व पोलीस उप निरीक्षक सविता तांबे व त्यांचे पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हयात/राज्यात जाण्यासाठी ऑन लाईन परवानगी देण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांना घरबसल्या परवानगी मिळण्याचा मार्ग सोयीस्कर झाला. तसेच पोलीस निरीक्षक संतोष पाटील, मधुकर बारगळ, विशेषशाखा, औरंगाबाद यांच्या नियंत्रणाखाली सपोनि. सुरेश गणोरकर व त्यांचे पथकाचे मार्फत सामाजिक संस्था/स्वयंसेवक यांना गरजुनां अन्न धान्य वाटप करणे, अत्यआवश्यक वाहतुक सेवेसाठी पासेस व परवानगी देणेचे काम, पोउपनि संजय शिसोदे व त्यांचे पथकाकडे आयुक्तालय अंतर्गत तसेच जिल्हया बाहेर जाणार्या इसमांना ऑनलाईन तसेच ऑफ लाईन परवानगी देणेचे काम असे वेगवेगळे पथक तयार करुन त्यांना परवानगीसाठी येणा-या इसमांना करोनाचे संसर्गाबाबतची माहिती देऊन शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटीचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.या बाबत सुचना देऊन त्यांनी आता पर्यंत 32,000 परवानगी देण्याचे काम केले आहे.
पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील सर्व पोलीस ठाणे येथील विशेष शाखेतील कर्मचारी यांच्याकडुन परराज्यातील मजुरांच्या नावांची यादी मागविण्यात आली. पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुजता एन.राजपुत यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करुन पोलीस ठाणे येथुन आलेल्या माहितीचे एकत्रीकरण करुन नऊ हजार मजुरांची यादी तयार केली. या यादीचे (22) राज्याप्रमाणे वर्गीकरण करुन राज्यातील जिल्ह्या प्रमाणे छाननी करुन सदर मजुरांना नेमण्यात आलेल्या विशेष रेल्वेने पाठविण्याकरिता संबंधीत रेल्वेच्या प्रवासमार्गानुसार यादी तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन आलेल्या रेल्वे वेळपत्रकानुसार रेल्वे स्टेशन येथे बंदोबस्त नेमण्यात आला. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी आप आपल्या हद्दीतील संबंधीत रेल्वेतील प्रवासी मजुर यांना एका ठिकाणी बोलावुन त्यांना रेल्वेस्टेशन येथे रेल्वेच्या वेळपत्रकानुसार पोहचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली. रेल्वे स्टेशन येथे पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर मजुरांची आलेल्या यादीनुसार नावे तपासुन तेथे नेमण्यात आलेल्या वैद्यकीय पथकामार्फत मजुराची वैद्यकीय तपासणी करुन कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन कायदा व सुव्यवस्था राखुन त्यांना रेल्वे मध्ये बसवुन त्यांचे स्वगृही रवाना केले.
तसेच जम्मु-कश्मीर येथील मजुरांना त्यांचे मुळगांवी जाण्यासाठी नागपुर येथे रेल्वेची व्यवस्था असल्याने संबंधीत जिल्हयाचे विभागीय आयुक्त व पोलीस आयुक्त यांचेशी संपर्क साधुन त्या मजुराची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना औरंगाबाद येथुन नागपुर येथे बसची व्यवस्था करुन पाठविण्यात आले. उर्वरीत राज्यातील मजुरांना जसजसे वाहनांची/रेल्वेची व्यवस्था झाल्यास त्यांना पाठविण्याची तजवीज ठेवली आहे. रेल्वे प्रमाणे शासनाने परराज्यातील मजुरांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बसने राज्याच्या सिमे पर्यंत मोफत सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांनी औरंगाबाद येथील म.रा.प.मं. चे विभाग नियंत्रक अमोल आहिरे तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी माने यांचेशी संपर्क करुन तसेच समन्वय साधुन औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीतील राज्या बाहेर जाणा-या मजुरांना बस सेवा उपलब्ध करुन देणेबाबत चर्चा केली. त्यानुसार तपाडीया मैदान, अदालत रोड, औरंगाबाद येथे म.रा.प.मं.चे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी यांचेकडुन प्राप्त यादीवरुन पोलीस आयुक्तालयातील पारपत्र शाखेतील एका पथकाचे मार्फत बाहेर राज्यातील जाणा-या 22 लोकांचा गट तयार करुन प्रत्येक गटाची वैद्यकीय तपासणी करुन परराज्यात जाण्याची तात्काळ परवानगी देणेची कारवाई करुन त्यांना बसची सेवा उपलब्ध करुन रवाना केले.वैद्यकिय तपासणीसाठी धूत हॉस्पीटलच्या पथकाने सहकार्य केले.
आता पर्यंत 171 बसेस व्दारे 3500 मजुर लोकांना त्याच्या राज्या लगतच्या महाराष्ट्रच्या सिमेवर रवाना केले. लॉक डाऊनमध्ये दिवसंदिवस वाढ होत असल्याने परराज्यातील लोकांची तसेच राज्यातील अडकलेले लोकांची मुळगांवी जाण्यासाठी परवानगी मिळणे करिता गर्दी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्यावेळी संबधित पथकाने दिवसरात्र मेहनत घेऊन लोकांचे अडीअडचणी समजुन तसेच अटी व शर्ती सांगुण त्यांना तात्काळ परवानगी देण्याचे काम केले. सदर कामासाठी वेळोवेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उप आयुक्त मिना मकवाना यांनी मार्गदर्शन केले व प्रोत्साहन देऊन प्रत्येक कामाचा पाठपुरवा केला. सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्रीमती मिना मकवाना तसेच विशेष शाखा व पारपत्र शाखेचे अधिकारी व कर्मचारी उत्तमरित्या करीत आहेत.
Leave a comment