येसगाव नं.1 येथील गिरीजा  प्रकल्पात जेमतेम पाणी असून, गाळ उपसा सुरू

खुलताबाद । वार्ताहर

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची दिवसेंदिवस टंचाई वाढत चाललेली आहे. तालुक्यातील गिरिजा प्रकल्पातील  जलसाठा काही प्रमाणात जेमतेम कोरडा झाला असुन यंदा ही शहरासह तालुक्यात कमी पाऊस झाल्याने पाणी बाणीचे भीषण संकट उभे राहिले आहे. खुलताबाद तालुक्यातील येसगाव नं 1.येथील गिरिजा मध्यम प्रकल्प आखेर जेमतेम कोरडाठाक पडला असूण प्रकल्प मुख्यनदी मधून गाळ उपसा व वाहतुक सुरू झाली आहे. खुलताबाद तालुका, शहर ग्रामीण साठी गिरिजा प्रकल्पात पाणी साठा अतिशय महत्वाचे आहे. गिरिजा प्रकल्प गत तीनचार वर्षा पासून कोरडाठाक पडून होता. मात्र वर्ष 2019-20 आर्थिक वर्षांत परतीच्या पावसाने व अवकाळी पावसाने प्रकल्पात ग्राऊंड लेवल पाणी साठा जमा झाला होता. 

पाणी साठया कडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने काही पाणी चोरीस गेले तर काही पाण्याचे बाष्पीभवन झाले. आणि ऐन उन्हाळ्यात एप्रिल, मे दरम्यान प्रकल्पातील पाणी साठा वाळून प्रकल्प कोरडे सारखे बनले आहे. व त्यातून शेतकर्‍यांनी प्रकल्पच्या नदी मध्यातून गाळ भरने सुरू केले आहे. तर त्याच ठिकाणी प्रकल्पात ठिकठिकाणी टरबुज खरबुज ची शेती करण्यात येत आहे. त्यात येथे साईडवर प्रकल्पाच्या शाखा कार्यालयत कुणीच नसल्याने स्वच्छता अभावी प्रकल्पात सर्वत्र वेड्यावाकड्या बाभळी झाडीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळा रोहीण्या 25 मे पासून सुरू होत असून 7 जुन पावसाळा 20-22 दिवसावर येवून ठेपला आहे. खुलताबाद शहर तालुका ग्रामीण या प्रकल्पावर पाण्यासाठी अवलंबून असल्याने त्यांचे मात्र पाण्यासाठी हाल होणार आहे. खुलताबाद तालुक्यात पाण्यासाठी गिरिजा प्रकल्पच महत्वाचे स्त्रोत आहे. हे विशेष. गंधेश्वर प्रकल्पात 35-36% टक्के पाणी साठा उपलब्ध आहे परंतु तो पाणी पुरवठा पाईपलाईन द्वारा गंधेश्वर धरणातून गिरिजा धरणात आणावे लागते. यात पाईपलाईन दुरस्ती, तुटफूट, जोडणी,आदि बारा भानगडी करावे लागते. तसेच देखरेख करावी लागते. यामुळे ते किचकट वाटतं गिरिजा प्रकल्पात सरळ पाईपलाईन जोडणी असल्याने सरळसहज शहर व तालुका ग्रामीण भागात पाणी पुरवठा होतो.आता मात्र  गिरिजा प्रकल्प कोरडा पडल्याने खुलताबाद शहर तालुका ग्रामीण पाणी टंचाईत आले आहे. त्यात पावसाळा फक्त 20-22 दिवसावर आले आहे. पाऊस झाल्यास गंधेश्वर धरणातून पाणी आणण्याचे काम पडणार नाही. नसता गंधेश्वर प्रकल्पातून पाणी आणण्याची गरज पडणार आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.