बीड | वार्ताहर

 

जिल्ह्यात दिनांक आजपासून पूढील आदेशापर्यंत विषम दिनांकास सकाळी ७ ते द.२ या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळून ) उपडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.यादेशानुसार जिल्हाधिकारी बीड रेखावार यांनी पुढील निर्देश लागू आहेत.

विषम दिनांकास सकाळी ७ ते द.२ या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळून ) उपडण्यास परवानगी देण्यात येत आहे. उच्च न्यायालय खडपीठ औरंगाबाद यांच्या जनहित याचिका क्रमांक १०५८९/२०२० मधील दिनांक १२/०५/२०२० रोजीच्या निर्देशान्वये या कार्यालयाचे निडली ॲप वापराविषयीच्या दिनांक ०९ मे ०२० रोजीच्या संपूर्ण आदेशास कसल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरीही त्याचा वापर सर्व किराणादुकानदारांच्या सहकार्याने सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी या अॅपचा अधिकाधिक वापर करुन घराबाहेर येणे टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.सर्व घाऊक  विक्रेत्याची दुकाने विषम दिनांकास दुपारी ३.०० वा.नंतर आणि सम दिनांकारा पूर्ण दिवस खुली राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. याच काळामध्ये किरकोळ दुकानांना त्यांच्या दुकानात घाऊक विक्रेत्याकडून किंवा अन्य मागनि सामान आणण्यासाठी ही परवानगी देण्यात येत आहे.

■ विषम दिनांकास सकाळी ६.३० ते दु.२.३० वा या काळामध्ये शहरी भागामध्ये सर्व प्रकारच्या मालवाहू गाडया (पिकअप व्हॅन, छोटा हत्ती. ट्रक इ.सह सर्व) यांना प्रवेशास मनाई असेल.

■ वाहतूक पास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस चार चाकी,अॅटो, दुचाकी यांच्या वापरास शहरी भागात संपूर्ण मनाई असेल.परंतु शासकीय शाळा,वसतिगृहे इत्यादी बंद असणा-या शासकीय आस्थापनावरील कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय कर्मचारी, बैंक कर्मचारी व इतर जिवनावश्यक सेवेतील व्यक्ती यांना सवलत
देण्यात येत आहे.

■ वाहनारा इंधन यापूर्वीचे निर्देशाप्रमाणेच देण्यात यावे.

■ वधू व वरा व्यतिरिक्त १० पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत, अशा घरगुती विवाहास परवानगी देण्यात येत आहे.

■ केश कर्तनालय, ब्यूटी पार्लर यांच्यासाठी याआधीचे आदेश कायम राहतील.

■ जी कामे या आधी कोणत्याही विषम दिनांकास सकाळी ७.०० ते ९.३० मध्ये अनुज्ञेय होती. ती सर्व कामे आता सर्व विषम दिनांकांना सकाळी ०७.00 ते दु.२.०० वा या काळात (बैंकासह) अनुज्ञेय राहतील,

■.शहरी भागातील व्यावसायिक परिसरातील सर्व प्रकारची शासकीय तसेच खाजगी बांधकामे व रस्त्यांची कामे विषम दिनांकांस सकाळी ६.३० ते दु.२.३० ही वेळ वगळता करता येतील, परंतु या कामामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी वाहतूकीस अडथळा अथवा गर्दी होऊ नये.

या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत असताना नागरिकांनी कोठेही गदी करु नये, सामाजिक अंतराये भान ठेवावे, मास्क व सेंनीटायझरचा वापर करावा व कोवीड-१९ चा विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्व आवश्यक ती काळजी घ्यावी आणि केवळ आवश्यकता असेल तेव्हांच घराबाहेर यावे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.