खूलताबाद । वार्ताहर
शहर व तालुक्यात जेवढे सरकारी अधिकारी व कर्मचारी आहे त्यांनी ये जा न करता जिथे आहे त्याच गाव किंवा शहरात थांबावे असे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांना माजी सभापती दिनेश अंभोरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, नगरसेवक अविनाश कुलकर्णीसह पदाधिकारीनी दिले.
औरंगाबाद शहराला कोरोना या संसर्गजन्य विषाणूने बर्यापैकी आपल्या विळख्यात घेतले असुन आत्तापर्यंत शहरात तिन शतक पार करून चौथ्या शतकाच्या तयारीत कोरोना विषाणूची वाटचाल सुरू झाली असून . त्यात दहा रोग्यांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला असल्याने औरंगाबाद शहरात नागरिकांची झोप उडाली असून हा संपूर्ण जिल्हा रेड झोन घोषित करण्यात आल्याने नागरिक आपल्याच घरात बंदीस्त झाले आहे. दिवसेंदिवस शहरात रोग्यांचे प्रमाण वाढीने ही फार मोठी चिंतेची बाब आहे. खुलताबाद शहर व तालुका परीसर ग्रामीण भागात अद्याप पर्यंत मात्र कोरोना विषाणूचा शिरकाव झाला नाही ही अत्यंत सुखद आणि आनंद दाइ बाब आहे. परंतु जर या जिवघेण्या विषाणूचा शहर व परिसरात व ग्रामीण भागात शिरकाव झाला तर मात्र याला आटोक्यात आणने हे फार मोठे आव्हान होउन बसेल. कारण ग्रामीण भागात परिपूर्ण अशी आरोग्य सुविधा नसल्याने परिस्थिती आवाक्या बाहेर जाउ शकते. परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होउन बसेल करिता संपूर्ण खुलताबाद शहर आणि तालुक्यात संपूर्ण रस्ते बाहेरील व्यक्तीस बंद करण्यात आले. परंतु जेवढे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी खुलताबाद शहर आणि ग्रामीण भागात कार्यरत आहे. त्यांनी मात्र आपले राहण्याचे ठिकाण हे औरंगाबाद शहराला बनविले असल्याने ते दररोज खुलताबादला ये जा करीत असल्याने त्यांच्याकरवी मात्र कोरोनाचा शिरकाव खुलताबादला आणि ग्रामीण भागात होउ शकतो यात तिळ मात्र शंका नाही. करिता माजी सभापती दिनेश अंभोरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, नगरसेवक अविनाश कुलकर्णीसह अन्य पदाधिकार्यांनी खुलताबाद येथे बैठक घेऊन यात खुलताबाद शहर व ग्रामीण तालुका येथे तहसील अधिकारी कर्मचारी. पंचायत समिती अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, दुरसंचार अधिकारी कर्मचारी, बँक कर्मचारी अधिकारी, विद्युत मंडळ अधिकारी कर्मचारी खुलताबाद शहरासह ग्रामीण भागात औरंगाबाद हून ये - जा करत आहे. औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. व तेथे यामुळे संचारबंदी सह अनेक उपाय करण्यात येत आहे. परंतु तेथून म्हणजे औरंगाबाद शहरातून अधिकारी व कर्मचारी दररोज ये - जा करत असल्याने त्यामुळे तालुक्यात कोरोना लगण होण्याची भिती नागरिकात वाढली आहे. ही भिती दहशत बघता खुलताबाद येथील पदाधिकारी माजी सभापती दिनेश अंभोरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी नगरसेवक अविनाश कुलकर्णीसह अन्य कार्यकर्त्यांनी मा. मुख्यमंत्री, मा. जिल्हाधिकारी मा. आमदार. यांना निवेदन देवून अवगत केले व सदरील अधिकारी कर्मचार्याना मुख्यालय थांबण्याचे व ये - जा न करण्याची सक्ती करण्याची मागणी केली आहे. व या ये - जा मुळे तालुका भर संताप आहे. तालुका कोरोना निरक असताना हा प्रकार वाढू शकतो. यास गंभीरतेने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Leave a comment