औरंगाबाद | वार्ताहर

शहरातील रोशन गेट भागात राहणार्‍या 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज (10मे) सकाळी आठच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पन्नास वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दोन मे रोजी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 13 झाली आहे. 

 रोशन गेट भागात राहणार्‍या व्यक्तीला जास्त धाप लागत असल्याने व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्यामुळे त्यांना तीन मे रोजी सकाळी चार वाजता घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना मधुमेह होता, त्यांना कोरोनामुळे न्यूमोनिया झाला होता व मूत्रपिंडाचा आजार असल्याने त्यांचे डायलिसिस चारवेळा करण्यात आले होते.त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे सहा मे रोजी रात्री आठ वाजता कृत्रिम श्वास त्यांना देण्यात आला. मात्र दोन दिवसापासून रक्तदाब कमी झाल्यामुळे व न्यूमोनिया आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नसल्याने त्यांचा आज सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला. अशी माहिती घाटी रुग्नालयतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.

आतापर्यंत झालेले मृत्यू

5 एप्रिल सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू

14 एप्रिल आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

18 एप्रिल बिस्मिल्ला कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

21 एप्रिल भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू

22 एप्रिल आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू.

27 एप्रिल किलेअर्क येथील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू

28 एप्रिल किलेअर्क येथील 77 वर्षीय  महिलेचा मृत्यू

1 मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील 47 वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू.

2 मे नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

3 मे देवळाई येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

5 मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू.

7 मे आसेफिया कॉलनीतील 95 वर्षीय महिलेचा मृत्यू

10 मे रोशन गेट भागात राहणार्‍या 50 वर्षीय पुरुष

 

ReplyForward

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.