औरंगाबाद । वार्ताहर

लॉकडाऊनच्या काळात हाताला रोजगार नाही मग पोट कसं भरणार ? हा प्रश्न मजुरांसमोर उभा ठाकलायं. अशावेळी गावी जाण्याचाच पर्याय समोर असून मजुरांनी गावी जाण्याची वाट देखील धरली. दरम्यान विश्रांतीसाठी रेल्वे रुळावर झोपलेले 16 मजूर मालगाडीखाली चिरडले गेल्याची बातमी समोर आली.आम्ही रस्त्यावर चाललो तर पोलीस आम्हाला मारतात. म्हणून रेल्वे रुळाचा मार्ग आम्हाला योग्य वाटला असे एका मजुराने खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

खाण्यापीण्याच्या प्रश्नापासून मजुरांसमोर अनेक समस्या आहेत. दरम्यान यातील एका मजुराने आपली दु:ख व्यथा व्यक्त केली आहे.चुकीच्या रस्त्याने जात असल्याचे पोलीस आम्हाला मारतात. पण आमच्यासाठी खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. स्पेशल ट्रेन पाठवणार असे सरकार म्हणतेय पण तशी व्यवस्था काही दिसून येत नाही. अशावेळी आम्ही पायी जाऊ नाहीतर काय करु ? असा प्रश्न मजूर उपस्थित करत आहेत. औरंगाबाद-जालना मार्गावर करमाडजवळ पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद-जालनादरम्यान हे सर्व मजूर रुळांवर झोपले होते. जालनाहून भुसावळकडे पायी जाणारे मजूर, मध्यप्रदेशला निघाले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने मध्येच आरामासाठी ते रुळांवरच झोपले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ही दुर्घटना झाल्यानंतरही रेल्वे रुळामार्गे गावाकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.