आज निवडणुकीची भूमिका जाहीर करणार!

छत्रपती संभाजीनगर : आपली विधानसभेचे निवडणूक वाचावी, किमान आपल्या मतदारसंघात तरी कुठला त्रास होऊ नये, यासाठी सर्व पक्षांचे नेते आणि इच्छुक मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या घरी जात आहेत, पण मनोज जरांगे मात्र मुस्लिम धर्मगुरूच्या दारी गेले. त्यांनी अंतरवाली सराटीतून छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन मुस्लिम धर्मगुरू ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल नाव बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. त्यांच्याशी दोन तास चर्चा केली.  मराठा समजाची भूमिका सोईची ठरल्यास सत्तेचं सिंहासन मिळवण्यास अडचणी येणार नाहीत. मात्र मनोज जरांगे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. असे असताना जरांगे यांनी मुस्लीम धर्मगुरुशी चर्चा केली आहे. 

जरांगे आणि सज्जाद नोमानी यांच्यात दोन तास चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन 19 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि अनेक इस्लामिक पुस्तकांचे लेखक असलेले सज्जाद नोमानी यांची  भेट घेतली. या द्वयीमध्ये तब्बल दोन तास झाली चर्चा झाली आहे. जरांगे आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. थेट निवडणुकीत सहभागी व्हायचे की पाडापाडीचे राजकारण करायचे? हे आज जरांगे सांगणार आहेत. त्याआधी जरांगे यांनी मुस्लीम धर्मगुरूशी केलेल्या या चर्चेला चांगलेच महत्त्व आहे.

मुस्लीम धर्मगुरू यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला 

जरांगे यांनी या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. बसल्यावर वेगवेगळ्या चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्या समजात त्यांचे एक वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील. एक वेगळं समीकरण उभं राहिलं पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या  

माणुसकी जिवंत ठेवून एकत्र यायला हवं

दोघांमधील चर्चा सकारात्मक होती. आपण गोरगरीबांसाठी काम करत आहोत, हे जाणून ते समाधानी आहेत. धर्मपरिवर्तन, सत्तापरिवर्तनासाठी आपण एकत्र आलेलो नाहीत, ही गोष्ट त्यांना मान्य आहे. गोरगरीब, दलित, शेतकऱ्यांना, गोरगरीब मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर माणुसकी जिंवत ठेवून एकत्र यायला हवं. प्रत्येकाला भेटण्याचा, एकत्र येण्याचा अधिकार आहे. आपलं भविष्य आजमावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हाच प्रयत्न आम्ही करत आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. 

जरांगे आणि राजकीय तज्ज्ञ, अभ्यासकांची भेट

दरम्यान, याआधी जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत सध्याचे राजकारण तसेच त्यांच्या भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाली. बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ते लोकसभेप्रमाणे यावेळी देखील पाडापाडीचीच भूमिका घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळावावा, असं काही नसतं. पाडण्यातसुद्धा विजय आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनची तयारी

पण सज्जाद नोमानी हे मुस्लिम विद्वान आहेत. त्यांच्या समाजात त्यांचे वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांनी विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले आहेत. ते दोन दिवसांत राज्यातल्या मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा करून आपला निर्णय सांगतील, पण एक वेगळा समीकरण उभे राहिले पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी या भेटीनंतर केले. याचा अर्थ मनोज जरांगे हे मुस्लिम + मराठा कॉम्बिनेशन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.