जगतापच्या हाबाड्याने आडसकर घायाळ
माजलगाव : उमेश जेथलिया
2004 नंतर प्रथमच माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षाकडून मतदारसंघ बाहेरील उपरे उमेदवार न देता मतदार संघातील स्थानिकचा उमेदवार दिल्यामुळे महायुतीचे आ प्रकाश सोळंके विरुद्ध महाविकास आघाडीचे मोहन जगताप अशी स्थानिक उमेदवारात घमासान होणार आहे.मात्र पहिली लढाई जिंकत मोहन जगताप यांनी रमेश आडकर यांना हाबाडा दिला आहे.
आठ दिवसा पूर्वी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उमेदवार म्हणून आ प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरही शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर होत नव्हता. आडसकर की जगताप या चर्चेत दोन दिवसापूर्वी रमेश आडसकर यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे रमेश आडसाकार हे महाविकास आघाडीकडून उमेदवार येतील असे वाटतं असतानाच आज मोहन जगताप यांचे नाव घोषित करण्यात आले. 2004 च्या विधानसभेला बाजीराव जगताप आणि प्रकाश सोळंके यांची लढत झाल्यानंतर 2009 व 2014 ला भाजप कडून परळी चे आर टी देशमुख तर 2019 ला केजचे रमेश आडसकर हे उमेदवार भाजपने लादले होते. 2004 नंतर प्रथमच महायुती कडून पून्हा स्थानिक उमेदवार प्रकाश सोळंके आले असून महाविकास आघाडीने स्थानिक उमेदवार म्हणून मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्याने 2004 नंतर प्रथमच स्थानिक उमेदवारात 2024 चीं लढत होणार आहे.
भाजप मध्ये पोकळी
रमेश आडसकर व मोहन जगताप दोघांनी भाजपला रामराम केल्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून भाजप निष्ठावंतचीं कूचम्बना होत आहे. आज केवळ नितीन नाईकनवरे भाजप साठी आशेचे किरण आहेत मात्र ते ही जरांगे पाटील यांच्या कडे उमेदवारी साठी इच्छुक आहेत.
जगताप यांचा आडसकर यांना हाबाडा
हाबाडा म्हणून प्रसिद्ध असलेले रमेश आडसकर यांना मात्र पक्ष प्रवेश केल्यावरही उमेदवारी न मिळाल्यामुळे मोहन जगताप यांनी आडसकर यांनाच हाबाडा दिल्याचे चित्र असून जोरका झटका धीरेसे.... अशी चर्चा मतदारात सुरु आहे.
माजलगावमध्ये जरांगेनी उमेदवार दिल्यास आघाडीची वाट बिकट
प्रदीप दादा सोळंके,गंगाभिषण थावरे, नितीन दादा नाईकनवरे,विजय दराडे, जगदीश काका फरताडे, संतोष दादा डावकर, शहाजी सोळंके,मनोज तात्या जगताप,हनुमंत फपाल,सुंदर भोसले,डॉ. उद्धव नाईकनवरे, अशोकराव नरवडे,अशोक आबा डक यांनी 24 तारखेस मनोज जरांगे यांच्या दरबारात उमेदवारी मागितली असून जरांगे यांनी उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका आघाडीचे जगताप यांना बसण्याची शक्यता आहे.
आडस्कर अपक्ष?
दोन दिवसापूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेलं रमेश आडसकर हे आज 11 वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पून्हा बंडखोरी करण्याच्या मनस्थितीत आहे.
Leave a comment