बीड दि.19(प्रतिनिधी):- न लढल्यास भाजपचा सुपडा साफ होणार हे निश्चित.पण हे काही आंदोलनाचं ध्येय नाही.कारण, ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन उभं राहिलेलं आहे.शिवाय

भाजपचा सुपडासाफ झाल्यानंतर जे सत्तेवर येणार आहेत,ते काही ओबीसीतून आरक्षण देणार नाहीत.कारण आज सत्तेवर नसतानाही, ते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या! असं साधं

म्हणायलाही तयार नाहीत.फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध रान उठवणे खूप सोपे आहे.पण हेच निवडणुकी नंतरच्या परिस्थितीत मराठा असल्यामुळे खा शरद पवारांविरुद्ध तुम्ही काही

बोलू शकणार नाहीत; किंवा त्यांचे काही करू शकणार नाहीत.त्यामुळे न लढण्याचा निर्णय घेऊन फक्त भाजपच संपणार आहे असं नाही, तर आंदोलनाची विश्वासार्हताही संपण्याचा धोका त्यात

आहे.तसे जरांगे पाटील खूप प्रगल्भ आहेत.पण आंदोलनाच्या 14 महिन्यानंतरच्या आजच्या परिस्थितीत, निवडणूक न लढवण्याचा निर्णय जर मनोज जरांगे पाटलांनी घेतला, तर त्याला फक्त

अविचारच म्हणावा लागेल,असे आरक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.

              पत्रकात असे म्हटले आहे की,निवडणूक लढवण्यापेक्षाही महायुतीचा पराभव महत्त्वाचा मानून जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास महत्त्व देऊ नये, असे आम्ही लोकसभा

निवडणुकीपूर्वीच लिहिले होते.कारण मार्च अखेरपर्यंत जरांगे पाटलांवर टीका करणारे भाजपचे नेते एप्रिल महिन्यात मात्र अचानकपणे जरांगे पाटील व त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या विचाराचे

कौतुक करू लागले होते.म्हणजे फडणवीस व भाजपला हे चांगल्या प्रकारे कळत होते की, जरांगे पाटलांनी आपले उमेदवार दिल्यास त्यांना मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होईल व उर्वरित

मतांमध्ये आपण महाविकास आघाडीला सहज गुंडाळू शकतो.असा भाजपचा विश्वास असल्यामुळे जरांगे पाटलांना कौतुक करून निवडणूक लढण्यास भरीस पाडण्याकरिता भाजपचे प्रयत्न चालू झाले

होते.पण जरांगे पाटलांनी न लढण्याचा योग्य निर्णय घेतला व भाजपचे मनसुबे हाणून पाडले.पण त्यामुळे पक्ष म्हणून भाजपचा किती मोठा पराभव झाला हे आपल्याला माहित आहे.आताही तशीच

परिस्थिती आहे, पण वेळ मात्र निर्वाणीची आहे. कारण लोकसभा न लढून चालले, पण आता विधानसभा न लढून चालणार नाही. कारण लोकसभा न लढवल्यामुळे ज्यांना त्याचा फायदा झाला त्या

महाविकास आघाडीतील एकही नेता त्यांच्या विजयाचे श्रेय जरांगे पाटलांना द्यायला तयार नाही.शिवाय उलट महाविकास आघाडी संधी साधून नव्या जोमाने मराठा समाजाबरोबर बेईमानी करायला

सरसावली असल्याचेच दिसत आहे.पण त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडी मधील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे आता महाविकास आघाडी व भाजप

बाबत म्हणता येऊ शकते.

                     कारण, देवेंद्र फडणवीस माझ्या पक्षाचा डीएनए ओबीसीचा आहे असे 2021 पासून म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर व त्यांनी मराठा समाजाला 2018 मध्ये दिलेले

आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर सातत्याने व खूप अभिमानाने म्हणत आले आहेत.मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन उभे राहिल्यानंतरही त्यांनी तसे म्हणण्यात कधी खंड पडू दिलेला

नाही.आम्ही प्रथम हिंदुत्ववादी आहोत व त्यानंतर ओबीसीवादी आहोत.मराठ्यांचे विरोधक नसलो तरी आम्ही कुठल्याही प्रकारे मराठावादी किंवा मराठ्यांचे हितचिंतक मात्र निश्चितपणे नाहीत असेच

त्यांना म्हणायचे आहे,जे त्यांनी कधीच लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही.आणि ते मराठाविरोधी आहेत असा आरोप झाल्यानंतरही त्याचा निखालस खुलासा करण्याच्या भानगडीतही ते मुद्दामहून कधी

पडले नाहीत,कारण त्यांना तेच हवे होते,हे मनोज जरांगे पाटलांनी लक्षात घ्यायला हवे.तसेच हे ते सगळं यासाठी करत आहेत की त्यांची सगळी मदार ओबीसी वरती आहे.व त्यासाठी त्यांनी मराठ्यांना

10% आरक्षण देऊन फसवूनही दाखवलेले आहे. त्यामुळे असे म्हणतात की ओबीसी समाजामध्ये आता फडणवीसांबद्दल खूप आदराची भावना आहे. व आपले फडणवीस असा उल्लेख फडणवीसांचा

ओबीसींकडून आता केला जातो, जे फडणवीस हे फक्त ओबीसीहितैशी असल्याचेच निदर्शक आहे.कारण आजपर्यंत दोन वेळा केवळ ओबीसींसाठी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन फसवलेले

आहे.ही मोठी कर्तबगारी देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींसाठी दाखवलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी व तिचे खा शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले व विजय वडट्टिवार सारखे चतुर

नेते आहेत.या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वांवरून समाजाशी शिताफीने व धूर्तपणे बेईमानी करण्याचे कौशल्य व कृतघ्नपणाचे प्रदर्शन सहजपणे करण्याची हातोटी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे

महायुतीच्या नेत्यांपेक्षा खूप अधिक प्रमाणात आहे, हेच दिसून येते,जे कोणीही नाकारू शकत नाही.त्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा होईल अशी भूमिका जरांगे पाटलांना आता घेताच येणार

नाही.सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द काढताना एकनाथ शिंदेचे कौतुक करणे व अजित पवारांचा नामोल्लेखही टाळणे बऱ्याच लोकांना पक्षपातीपणाचे वाटते, याकडेही जरांगे पाटलांनी

लक्ष दिलेले बरे! कारण एकनाथ शिंदेंमुळे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप होऊ लागले या कारणासाठी जर त्यांना सहानुभूती दाखवली जात असेल तर तिला गैरच म्हणावे लागेल. कारण स्वप्नातही नसलेले

मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना ते केवळ मराठा असल्यामुळेच भेटलेले आहे,व शिवसेनेसारख्या पक्षामध्ये उभी फूट पाडूनही त्यांचे राजकीय जीवन सुरक्षित राहिले आहे, ते केवळ ते मराठा

असल्यामुळे.पण जातीचे इतके मोठे लाभार्थी असूनही व महाराजांची शपथ घेऊनही,ओबीसीतुन आरक्षण देण्याचे धारिष्ट्य मात्र एकनाथ शिंदे दाखवू शकले नाहीत, ही त्यांची दुर्बलता समाजासाठी

खूप लाजिरवाणी आहे.शिवाय आपल्या या लज्जास्पद दुबळेपणाचे प्रदर्शन, "मी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारच!", असे ठासून सांगत आजही ते करत

आहेत, जे खूप संतापजनक आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भाजपचा सूपडासाफ करताना महाविकास आघाडी व एकनाथ शिंदे,अजित पवार यांना मदत होईल अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेता

कामा नये.म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणे व तोही कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी आघाडी किंवा युती न करता घेणे हाच जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी योग्य पर्याय

आहे.कारण आता निवडणूक लढवणे हेच जरांगे पाटील यांच्यासाठी आंदोलन असू शकते.तसेच लोकांना लढणाराच नेता आवडतो, परिणामांस भिऊन न लढण्याची भूमिका घेणारा नेता लोकांना

आवडत नाही.शिवाय, लढायचे की पाडायचे? याचा निर्णय घेऊ असे पाटील म्हणतात.पण असे करता येत नसते.कारण लढण्याच्या निर्णयामध्येच पाडण्याचा निर्णय अंतर्भूत असतो.नुसत्या

पाडण्याचा निर्णय घेण्याच्या मुळाशी आपलेपणा व परकेपणा असा भेदभाव दिसतो.पण खऱ्याने तर गरजवंत मराठ्यांना कोणीच आपले नाही हे ओळखून मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक

लढवण्याचा गाभीर्याने विचार करावा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की निवडणूक लढवणे हाच आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.शिवाय,राज्यात सहा कोटींच्या संख्येने असलेला मराठा समाज

किती प्रमाणात एकजूट झाला आहे ते सुद्धा निवडणूक लढल्यावरच कळू शकते.कारण,आजपर्यंत नेत्यांच्या सभेला प्रचंड संख्येने आलेल्या लोकांनी मतदान मात्र केलेले दिसलेले नाही.म्हणून मराठा

समाजामध्ये काही बदल झालाय की नाही? की,आजही तो प्रस्थापितांच्याच प्रभावाखाली आहे,हेही कळणे खूप गरजेचे आहे,असे प्रसिध्द केलेल्या पत्रकातून शिवाजी कवठेकर यांनी म्हटलेले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.