तात्काळ  रुग्णणवाहिका उपलब्ध करण्याची नागरिकांची मागणी 

पैठण । वार्ताहर

पैठण येथील रूग्णणवाहीका म्हणजे असुन अडचण अण...नसून खोळंबा मात्र हा खोळंबा लोकांच्या जिवावर बेतण्याच्या मार्गावर आहे. पैठणसाठी असलेली 108 रुग्णवाहीका कोरोनाच्या सेवेसाठी औरंगाबादला गेल्याने आपातस्थीतीत गोरगरीबांना आपली वाटनारी 108 रुग्णवाहीका आता नसल्याने आपतकालीन स्थीती निर्माण झाल्यास पैठणकरांना मोठी अडचण निर्माण होणार आहे.

पैठण शहर व परीसरातील जीवन वाहीनी असलेली 108 हि रुग्णवाहीका सिव्हील सर्जन यांनी औरंगाबादला कोरोनाचे रुग्ण वाहण्यासाठी बोलवल्याने ऐनवेळी शहरात कोणाकडे आपतकालीन परिस्थीती निर्माण झाल्यास खाजगी रुग्णवाहीका शिवाय पर्याय नाही, किवा ढोरकीन व बिडकीनची 108 रुग्णवाहीका बोलावी लागेल आणी बिडकीन पैठण पासुन तीस कि. मी. तर ढोरकीन 18 कि. मी असल्याने हे शक्य नाही. पैठण शहर व तालुक्याची लोकसंख्या पाहता शहरासाठी एक 108 रुग्णवाहीका आवश्यक आहे, सिव्हील सर्जनला अवश्यकता होती तर त्यांनी खाजगी रुग्णवाहीका ताब्यात घ्यायला हवी  होती  अशी प्रतिक्रिया सामन्य रुग्ण व पैठणकर व्यक्त करीत आहे, पैठणची 108 तत्काळ वापस पाठवा अशी मागणी शेख इंझमाम यांनी केली आहे.

दरम्यान लॉकडाऊनमुळे हातावर काम करून उपजिवीका भागवणारा वर्ग पुर्ता परेशान असून काही शाररीक ईजा झाल्यास ग्रामीण रूग्णालयाकडे धाव घेतांना दिसतो मात्र परिस्थिती त्याहुनही गंभीर असेल व औरंगाबादला रूग्णाला हलवायचे असेल तर गरज असते ती रूग्णवाहीकेची मात्र येथील 108 क्रमांकाची असणारी रूग्णवाहीका सिव्हिल सर्जन औरंगाबाद यांनी कोरोणा रूग्णासाठी आयात केली असल्याने पुन्हा एकदा पैठणच्या रूग्णांची सेवा वाहीका विना चव्हाट्यावर आली आहे .मात्र या गंभीर बाबीकडे लोकप्रतीनिधीचे उदासिन धोरण दिसत असून सामान्य नागरिक रूग्णवाहीका पैठणला मिळविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला मागणी करत  आहेत .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.