गंगापूर । वार्ताहर
शहरातील सर्व बँकेसमोर ग्राहकांना पैसे काढण्यासाठी भर उन्हात ताटकळत उभे राहून नंबर लावावे लागत असल्याने सर्व बँकांनी बँक मित्रांची नेमणूक करून ग्राहकांना तात्काळ सेवा देण्याची मागणी ग्राहकांमधून करण्यात येत आहे. गंगापूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक या शाखा असून शाखेमध्ये भारत सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सर्व जन धन खाते असलेल्या महिलांच्या खात्यावर 500 रुपये आणि प्रधान मंत्री किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा केले आहे तसेच ग्राहकांचे जमा ठेवलेले पैसे काढण्यासाठी ग्राहकांना भरउन्हात लांबच लांब रांगा लावून नंबर लावावे लागत आहे एवढेच नव्हे तर ग्राहकांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही मात्र या सर्व बँकांच्या व्यवस्थापकांना ग्राहकांची काळजी का नाही, सर्व बँकांनी ग्राहकासाठी स्वतंत्र काउंटर उघडून तात्काळ ग्राहकांना सेवा देण्याची मागणी ग्राहक करत आहे.
हे पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बँकेमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी बँक मित्रांची नेमणूक करून ग्राहकांना वेळेवर सेवा देणे हे बँकेचे कर्तव्य आहे परंतु शहरातील सर्वच बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे बँक मित्राची नेमणूक केल्यास हे बँक मित्र मशीन द्वारे अंगठा ठेऊन रोकड उपलब्ध करून देतात यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही हे कार्य करत असताना बँकमित्र सरकारने सांगितलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत असून .ते स्वतः मास्क आणि हॅण्ड ग्लोज परिधान करून ग्राहकांना चार फुटाचे अंतर ठेऊन सोशल डिस्टन्स चे पालन करत ग्राहकांना सेवा देण्याचा प्रथम उपक्रम गंगापुर तालुक्यातील ढोरेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक धनंजय निलेवाड यांनी सुरू केला मात्र गंगापूर शहरातील सर्वच बँक ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे शहरातील बँकांनी बँक मित्राची नेमणूक करून ग्राहकांना वेळेवर सेवा देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
Leave a comment