औरंगाबाद । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात आणि त्यापुढेही शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच तंत्रस्नेही होत अध्यापनाचे कार्य स्मार्ट करावे असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हापरिषद प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केले. राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक समूहातील शिक्षकांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण ऑनलाइन कार्यशाळा झाली त्यावेळी उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर बोलत होत्या .औरंगाबाद जि. प .शिक्षण विभागाचे डी.आर .रोडगे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार तंत्रस्नेही शिक्षक समूह प्रशासक रामदास वाघमारे, वैशाली भामरे, मीरा वाघमारे, महादेव हवालदार, उमेश खोसे, नारायण शिंदे , दिनेश वाडेकर,छाया बैस /चंदेल, संदीप सोनवणे,प्रकाश चव्हाण आनंद आनेमवाड, प्रवीण ठाकरे, अजय काळे, करुणा गावंडे, राजकिरण चव्हाण, तानाजी खंडागळे, गणेश कुंभारे, नागनाथ घाटोळे, गीता केदारे, वंदना सलवदे, देविदास बुधवंत, रुपाली बोडके,विजय पाताडे, शेख नजमा,शोभा दळवी, बाळासाहेब निकाळजे आदी उपस्थित होते.
लाटकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची कार्यक्षमता वाढणे आवश्यक आहे त्यादृष्टीने या राज्यस्तरीय तंत्रस्नेही समूहातर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ऑनलाइन कार्यशाळा व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन शिक्षकांना वाचन लेखन चळवळीच्या प्रवाहात आणले यामागे समुहाचे प्रशासक व त्यांच्या टीमची मेहनत आहे. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिकविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले, यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी प्रत्येक शिक्षकांच्या शाळेचा व स्वतःचा ब्लॉग असावा तसेच नमुना चाचणी तयार करण्यासंदर्भात व विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार यांनी विविध व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण द्यावे व कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेविषयी प्रकाश चव्हाण यांनी अँप निर्मिती कार्यशाळा, आनंद पवार यांनी वर्कशीट चा अध्यापनात प्रभावी वापर, प्रवीण डाकरे यांनी ब्लॉग तयार करणे व त्याचा शैक्षणिक वापर, अजय काळे यांनी माझ्या उपक्रमाची नॅशनल पर्यंत झेप, करुणा गावंडे यांनी स्मार्ट पीडीएफ तयार करणे, राजकिरण चव्हाण यांनी शिक्षणातील ट्रेडर्स लॉक डाऊन च्या आधीचे व नंतरचे, तानाजी खंडागळे यांनी हाऊ-टू-मेक-स्मार्ट-इमेज,योगेश ढवारे आँनलाईन स्टेस्ट निर्मिती, वैशाली भामरे यांनी लिंक कशी तयार करावी,महादेव हवालदार यांनी स्मार्ट फोनचा अध्यापनासाठी कसा वापर करावा, प्रवीण ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचणी कशी घ्यावी ,रामदास वाघमारे यांनी बँनर व व्हिडिओ निर्मिती विषयी मार्गदर्शन केले. तंत्रस्नेही शिक्षक समूहावर प्राथमिक माध्यमिक विभागातील जवळपास अडीचशे शिक्षक ऑनलाइन सहभागी झाले होते. तंत्रस्नेही शिक्षक संदिप ढाकणे यांनी परिचय करून दिला. तर समुहप्रशासक रामदास वाघमारे यांनी अहवाल वाचन केले.नाशिक येथील तंत्रस्नेही शिक्षिका वैशाली भामरे यांनी सूत्रसंचालन केले. सांगली येथील तंत्रस्नेही शिक्षक महादेव हवालदार यांनी आभार मानले.
Leave a comment