औरंगाबाद । वार्ताहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डेडिकेटेड कोव्हीड रुग्णालयात 30 कोव्हीड -19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 27 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. एक पॉझिटिव्ह कोव्हीड रुग्ण बरा झाल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
औरंगाबादच्या समता नगरातील 38 वर्षीय कोव्हीड पॉझिटिव्ह पुरुष रुग्ण 20 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेत भरती झालेले होते. त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय येथून घाटीत पाठविले होते. त्यांचा कोव्हीडचा 10 एप्रिल रोजी अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण 86 टक्के असायचे. त्यांच्यावर नियमावलीप्रमाणे सर्व उपचार करण्यात आले. त्यांच्या रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. त्यांचा 14 व्या दिवसाचा व 15 व्या दिवसाचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे नियमावलीप्रमाणे पुढील दोन दिवस निगराणीखाली ठेऊन आज सकाळी 11.30 वाजता अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्या मार्गदशनाखाली तसेच डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल प्रमुख व मेडिसीन विभाग प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य यांच्या निगराणीखाली डॉ.अविनाश मुंडे, डॉ.अलीम पटेल, डॉ संदेश मालु, डॉ.संदीप चव्हाण, डॉ.चेतन, डॉ. दिग्विजय चव्हाण, अधिसेविका विमल केदारे, महेंद्र ब्रदर, प्रतिक जोशी ब्रदर, रोहिणी ठोकरे, हेमलता सिरसाट, संजिवणी बाहेकर या चमूच्या प्रयत्नाने हा कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना मुक्त झाला.
घाटीत आज दुपारी चार वाजेपर्यत एकूण 50 रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली. त्यापैकी 24 रुग्णांचे नमुने घेण्यात आले. यांच्यासह काल (दि.6) भरती असलेल्या पाच रुग्णांचे असे 29 रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत. संजय नगर येथील 29 वर्षीय महिला रुग्ण, भडकल गेट येथील 55 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा कोव्हीड - 19 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 42 वर्षीय कोव्हीड पॉझिटिव्ह पुरुष रुग्ण (रा.मकसुद कॉलनी , औरंगाबाद) यांना महानगर पलिका, आरोग्य केंद्र, नेहरु नगर, औरंगाबाद येथून घाटी येथे संदर्भित करण्यात आले. 58 वर्षीय स्त्री रुग्ण (रा.पुंडलिक नगर, औरंगाबाद) यांना मनपा, आरोग्य केंद्र, येथून घाटी येथे संदर्भित करण्यात आले आहे. 11 वर्षीय व 4 वर्षीय मुली तसेच 9 वर्षीय मुलगा (रा. संजय नगर,औरंगाबाद) यांना मनपा, आरोग्य केंद्र, येथून घाटी येथे संदर्भित करण्यात आले आहे. त्यामुळे घाटीच्या डेडिकेटेड कोव्हीड रुग्णालयात एकूण 30 कोव्हीड - 19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सरु आहेत. तसेच सद्यस्थितीत घाटी येथे 23 कोव्हीड-19 निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण 20 कोव्हीड निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. एकूण 82 रुग्ण भरती आहेत, असे घाटीच्या डॉ. येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.
मिनी घाटीत वृद्धेचा मृत्यू, आतापर्यंत 378 कोरोनाबाधित
विविध आजारासह कोविड 19 आजाराने बाधित असलेल्या असेफिया कॉलनीतील 95 वर्षीय महिला रुग्णाचा आज सकाळी 9.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 27 एप्रिल रोजी मिनी घाटीत दाखल केले होते. आज 126 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तर प्रयोगशाळेतून देखरेखीखाली असलेल्या 38 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अजून 126 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. औरंगाबाद शहरातील विविध भागात असलेल्या एकूण 22 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 378 झाले आहेत. कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) रेल्वे स्टेशन परिसर(1), जयभीम नगर (3), किलेअर्क (2), पुंडलिक नगर (9), हमालवाडी (4), कटकट गेट (3) या परिसरातील आहेत. यामध्ये प्रत्येकी 11 पुरूष आणि महिला रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 29 जण बरे होऊन घरी परतले, तर आजच्या वृद्ध महिलेसह एकूण 12 कोरोनाबाधित मृत्यू झाले असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आलेले आहे.
Leave a comment