पैठण । वार्ताहर
राष्ट्रीय ख्यातीच्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान मध्ये मागे जून 2019 ते अक्टोबर 2019 पर्यंत सदरील उद्यानात मी पैठणकर या सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्था, वकील,डॉक्टर,विद्यार्थी यांच्या श्रमदानातून व श्रमदानातून व सहाय्यातुन हजारो फुल झाडे उद्यानात लावण्यात आली.यास सुरुवातीस उद्यान प्रशासनानेही मोलाचे सहकार्य केले.परंतु गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विशेष लॉक डाऊन नंतर या वृक्षाकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.सर्व फुलझाडे जळून जाण्याच्या स्थितीत असून त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.नसता संपूर्ण उद्यान परत उजाड होईल या करिता खालील उपाययोजना करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन सोमवारी पाच मे रोजी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना तसेच अधीक्षक अभियंता, गोदावरी पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी प्राध्यापक संतोष गव्हाणे,संतोष गोबरे,रमेश लिंबोरे,बाळू आहेर, गोदावरी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता शिवकुमार खेडकर,शाखाअभियंता बंडू अंधारे यांची उपस्थिती होती.
या निवेदनात म्हटले आहे की मनरेगा योजनेच्या माध्यमातून उद्यानाची कामे करण्यात यावी.शक्य झाल्यास तसा प्रस्ताव शासन,विभाग,जिल्हास्तर वरून मंजूर करून घेणे. पाटबंधारे विभागाने यंत्रणा म्हणून काम करणे.यासाठी तहसीलदार यांनी प्रशासकीय मान्यता देणे, पाटबंधारे विभागाने त्वरित मजूर नेमणुकीसाठी प्रस्ताव मंजूर करून घेणे तूर्तास जे मजूर आहेत त्यांच्याकडून कामे करून घेणे.लॉक डाऊन नंतर उद्या सुरू झाल्यानंतर तिकिटाद्वारे येणारा महसूल उद्यानाच्या विकासासाठी दुरुस्ती साठी खर्च करण्यास विभागाला परवानगी देणे.यासाठी सक्षम अधिकारी यांनी शासन स्तरावर तसे आदेश प्राप्त करून घेणे.लरीश ींरज्ञशी म्हणून मी पैठणकर संघाची अधिकृत घोषणा पाटबंधारे विभागाने करणे, सर्वात महत्वाचे म्हणजे उद्यान एम.टी.डी.सी कडे सुपुर्द करणेबाबत पाटबंधारे विभागाने प्रस्ताव पाठविणे हा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांनी सदर प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेणे.आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार व अधिक्षक अभियंता गोदावरी पाटबंधारे विभाग औरंगाबाद यांना देण्यात आले आहे.आपण आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन उद्यानातील वृक्ष संपत्ती वाचावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Leave a comment