औरंगाबाद । वार्ताहर
शिवसेनेचे जेष्ठ नेते,मा.मंत्री तथा मराठवाड्याचे झुंजार नेते अभ्यासू नेते जयदत्त क्षीरसागर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केली आहे.पुढे बोलतांना ते म्हणाले की जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांना विकासाची जान व सामाजीक प्रश्नांचे भान आहे.अशा अनुभवी नेत्याला संधी दिली तर मराठवाडयात शिवसेना आणखी मजबूत होईल.सामाजीक सत्ता समतोल,सामाजीक न्याय प्रस्थापीत होईल. जयदत्त क्षीरसागर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आपले नेते वाटतात.प्रत्येक जाती धर्मात मिसळणारे ते नेते आहे.
भारतात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून शिवसेनेला वेगळेपण प्राप्त करून देण्यात ते महत्तवाची भूमिका पार पाडू शकतात.लोकसभा,विधान सभेच्या निवडणूकीत उमेदवारांना विजयी करण्यात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.केवळ बीड विधानसभा मध्ये दगा फटका बसल्यामुळे निसटता पराभव झाला.यातूनही त्यांनी भरारी घेऊन आपले सामाजीक कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे.कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा ना करता जनसामन्यांच्या प्रश्नांवर लढा देत आहे.नुकतेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा लाख रुपयांची मदत केली असून ते सामाजीक भान जोपसणारे लोकनेते असून त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली जावी हीच सर्वसामान्यांची भावना आहे. जयदत्त क्षीरसागर यांना विधान परिषदेवर घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार केली आहे.
Leave a comment