शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याहस्ते वाटप
औरंगाबाद । वार्ताहर
सोमवारपासून 3 र्या पर्वाला सुरुवात झाली आहे, हा लॉकडाऊन 17 मे पर्यंत असल्याने अन्नदानाची अखंड सेवा सुरु आहे. 22 मार्चपासून म्हणजेच 2 महिन्यांपासून शिवसेनेचे संभाजीनगर येथे गरजूंना अन्नदान सुरूच आहे. आतापर्यंत 50 हजार लोकांना फायदा झाला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून किराणा साहित्य व अन्नदानाचा मोठा आधार मिळाला आहे.
संचारबंदीमुळे अनेकांची जेवणाची मोठी अडचण झाली होती, त्यामुळे भाजी पोळी, शिरा, भात वरण, चटणी असे पोटभर भरेल इतकं जेवण देण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने दररोज बीड बायपास, बजाज हॉस्पिटल, घाटी रुग्णालय व कर्करोग रुग्णालय व जेजे रुग्णालय, हर्सूल, वाळूज, मिनी घाटी शनी मंदिर, गजानन मंदिर, नागेश्वरवाडी परिसरातील गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल युवासेना जिल्हा युवाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, प्रतीक बाफना, कमलेश झवेरी, प्रत्युष कन्नडकर, सुनील दायमा यांची उपस्थिती होती.
Leave a comment