पाचोड विजय चिडे;-

मान्सूनच्या पूर्वतयारीसाठी बळीराजा जोमाने कामाला कसून लागलेला असून पाचोड परिसरामध्ये  पूर्व मशागतीची कामे सुरू झाली असून शेतामध्ये नांगरणीस सुरुवात झालेली आहे. परंतु पूर्वी जी कामे बैलजोडी करत असे ती जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून शेतकर्‍यांच्या अंगणात दिसणार्‍या बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे.

नांगरणी,मोगडणी, पाळी आदी कामे पारंपारिक पद्धती ऐवजी ट्रॅक्टर द्वारे करण्यावर भर दिला जात आहे.बदलत्या काळात कमी वेळेत जास्तीत जास्त कामे करण्याचे सूत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून साकार होत आहे. त्यामुळे  शेतीची मशागत ट्रॅक्टरने करण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लहानशा खेड्यातही छोट्या शेतकर्‍याच्या दारापुढे ट्रॅक्टर दिसण्याचे कारण म्हणजे यांत्रिक शेतीला दिले जाणारे प्राधान्य हेच आहे.

सध्या कोरोणाची साथ असल्याने सगळीकडे  लाँकडाऊनचा जोर सुरू असून  बळीराजाने मात्र पूर्वमशागतीच्या सुरुवात केली आहे. पूर्वीच्या काळी बैलजोडी नांगरणी होत असल्याने नांगरणीसाठी मार्च महिन्यामध्ये शेतकरी सुरुवात करत असे मे -जुन महिन्यापर्यंत शेतकर्‍याची नांगरणी चालू असे व शेतकर्‍यांचा डेराही शेतातच असे शेतकर्‍यांना जेवणाचे डबे करून पाठवले जात असे कारण उन्हाने तप्त झालेली कडक जमीन नांगरता नांगरता अनेक दिवस जात होते. आज घडीला शेतीच्या कामाकरिता मंजूर मिळत नाहीत व कामे जलद करण्याची सवय पडल्याने, बैलाने नांगरणी करणे हे वेळखाऊ  तसेच किचकट  होते तसेच हवामान मधील बदल कमी-जास्त घडणारा पाऊस व जनावराचे खाद्य प्रचंड महागल्याने दुष्काळजन्य परिस्थिती चाराटंचाई त्यामुळे बैलजोडी सांभाळणे कठीण होउन नामशेष होत आहे या कारणाने काही वर्षात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे.शेतकरी आता शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साह्याने करीत आहे. मात्र डिझेल दर वाढीचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. पारंपारिक शेती मागे पडून आधुनिक शेती ट्रॅक्टरद्वारे करत असल्याचे चित्र सध्या पाचोड परिसरात दिसत आहे. जवळपास एक महिन्यापासून लाँकडाऊन सुरू आहे यावर्षी हंगाम लांबल्याने जमिनीची नांगरणी लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टर नांगरणी करून घेत आहोत बैलाच्या नांगराने नांगरट काढणे कठीण आहे.त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्याची गरज पडत आहे. कडुबा निर्मळ;- शेतकरी मुरमा.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.