फर्दापूर । वार्ताहर

शेतातील रस्त्याच्या वादातून एकाचा खुन करणार्‍या रवळा (ता.सोयगाव) येथील अकरा आरोपींना फर्दापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर दि.4 सोमवार रोजी माननीय न्यायालयाने तिन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे तर एक अल्पवयीन आरोपी अद्याप फरार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की  दि.2 शनिवार रोजी शेतातील रस्त्याच्या वादातून रवळा शिवारातील गट क्रमांक 71 मधील शेतात मिरची पूड,लोखंडी चिमटा व लाठ्या-काठ्यांनी करण्यात आलेल्या हाणामारीत डोक्यात मानेवर व कंबरेत लोखंडी चिमट्याचे घाव वर्मी लागल्याने वैद्यकीय उपचारासाठी नेतांना शेरसिंग गोबरु बातळे (वय 45 रा.रवळा ता.सोयगाव) यांचा मृत्यू झाला होता शेरसिंग गोबरु बातळे यांच्या मृत्यू नंतर जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत शेरसिंग बातळे यांच्या नातेवाईकांनी दि.3 रविवार रोजी घेतल्यामुळे काही काळ रवळा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्‍य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांनी रविवारी सकाळपासूनच फर्दापूर-अजिंठा व सोयगाव पोलिसान सह राज्य राखीव दलाचा बंदोबस्त रवळा गावात तैनात करुन मयताच्या नातेवाईकांची समजूत काढून आरोपींना दोन दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिल्याने हा तणाव निवळून मयत शेरसिंग गोबरु बातळे यांचा अंतिमसंस्कार करण्यात आला होता.

दरम्यान मयताचा अंतिम संस्कार होताच साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वात फर्दापूर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत पकड मोहीमेला सुरुवात केली रविवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी आरोपी धनंजय हरसिंग बातळे,सुरेश हरसिंग बातळे, मेरसिंग हरसिंग बातळे,हरसिंग हरचंद बातळे, अक्षय संजय बातळे, मनिषा धनंजय बातळे, फुलाबाई हरसिंग बातळे, यशोदा मेरसिंग बातळे, रेवताबाई संजय बातळे, शेनसिंग ईश्वर बातळे, सुरेखा शेनसिंग बातळे (सर्व रा.रवळा ता.सोयगाव) यांना अटक करुन दि.4 सोमवारी न्यायालया समोर हजर केले असता माननीय न्यायालयाने वरील अकरा ही आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.या प्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी अद्याप फरार असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनावरुन साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे या घटनेचा पुढील तपास करीत आहे. शेतातील रस्त्याच्या वादातून शनिवारी रवळा येथे झालेल्या हाणामारीत शेरसिंग गोबरु बातळे,जयवंताबाई शेरसिंग बातळे,जोरसिंग गोबरु बातळे व सबोताबाई गोबरु बातळे हे गंभीर जखमी झाले होते यातील शेरसिंग गोबरु बातळे यांचा वैद्यकीय उपचारासाठी नेताना मृत्यू झाला होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.