खूलताबाद । वार्ताहर

कोरोना विषाणूच्या मानवी जीवनावर होणारा विध्वंसक परिणाम आणि वाढत्या प्रभावाला लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून त्याचे परिणाम सुध्दा चांगले आणि परिपूर्ण जाणवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍यांदा लॉकडाऊन च्या घोषणेला जनतेकरवी उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर आणि महाविणाशक विषाणूला रोखण्याचा लॉकडाऊन हा निर्णय अगदी योग्य आणि महत्वपूर्ण आहे कोरोना बळी रोखण्यात शासनाला भलेही  यश मिळु शकेल परंतु भुखबळीच काय.

कोरोणासारख्या संसर्गजन्य विषाणूने सार्‍या जगाला आपल्या विळख्यात घेऊन हाहाकार माजविल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घेतलेल्या भारत बंद चा हा निर्णय स्वागतार्ह्य आहे. परंतु या लॉकडाऊनचा खूलताबाद शहर आणि परिसरामध्ये हातावर पोट असणार्‍या गरीब मात्र बेरोजगार झाला असून त्याच्यावर मात्र उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन होण्यास जवळपास दिड महिना झाला असून आमच्या हाताला काम नाही. काम नसल्याने पैसा येत नाही. पैसा आला नाही तर उपजिविका कशी भागविणार चुल कशी पेटनार मुलाबाळांचे भाकरीविना सुखलेले तोंड पाहुन  पोटात अगीचा गोळा उठत कोरोनाने तर नंतर परंतु भुखबळीने आम्ही अधिच मरु उपाशीपोटी कोरोनाशी कशी लढाई लढनार अशी प्रतिक्रिया उपाशीपोटी असलेले कामगार व्यक्त करीत आहे. सर्वत्र बंद असल्याने रीक्षा चालवुन आपला उदरनिर्वाह करणारे छोटेमोठे वाहनचालक घरात बसून असल्याने त्यांचा उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दगड फोडुन दगड जोडनारा बांधकाम कारागीर  आपली उपजिवीका चालवीनारे सुध्दा बेरोजगार झाले आहेत. विटभट्टीवर पोटभरनारे लॉकडाऊन मुळे वाहन बंद असल्याने लागनारा कोळसा मिळत नसल्याने मजुर बेकार झाले आहे. संचारबंदीमुळे जाण्यायेण्यास मज्जाव असल्याने माता भगीनी सुध्दा घरीच बसून असल्याने चोहोबाजूंनी हात बांधले गेले असल्याने मोठी अर्थिक कोंडी निर्माण होउन हातावर पोट असणार्‍यांची परिस्थिती अत्यंत बिकट आणि हलाखीची झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता याची गणना रेड झोन मध्ये करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील जनता सतर्कता बाळगून खेडेपाडे सुध्दा आप आपल्या परीने सिल करुन आपल्या गावात नाकाबंदी करुन गावाच्या मुख्य आणि लहानसहान रस्तेवर चेकपोस्ट उभारुन स्थानिक येनार्‍या जानार्‍यांचि चौकशी करूनच आतबाहेर सोडण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे बाहेरील व्यक्तीस तर गावात पुर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे अत्यावश्यक सेवेलाच फक्त बाहेर पडण्यास परवानगी दिली जात असल्याने . एवढे वातावरण कडक केले असता हातमजुर मात्र हतबल झाले असुन त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची घंटा घनघनत असुन रेशनकार्ड धारकांना प्रतिव्यक्ति पाच कीलो तांदूळ व्यतिरिक्त दुसरी कोणतीही मदत शासनाकडून अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत कोरोना विषाणूला रोखण्याचा लॉकडाऊन हा जसा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जसा . शासनाने घेतला आहे तसाच महत्वपूर्ण निर्णय भुखबळीरोखण्यासाठी सुध्दा शासनाने लवकरात लवकर घ्यावा अन्यथा कोरोना संक्रमणापेक्षा भुखबळीने मरनार्‍यांचा आकडाच मोठा असेल. यात शंकाच नाही. काही दानशूरांनी आप आपल्या परीने होइल तेवढी मदत गरजु पर्यंत पोहचविण्याचा विढा उचलला आहे. परंतु ते लोकतरी कीतीक गरजुंना कीतीक दिवस मदत करनार इथे देनार्‍यापेक्षा घेणार्‍यांचे हात जास्त आहे. इथे अन्न कमी परंतु पोट मोठे आहे. लॉकडाऊन उघडेपर्यंत आम्हाला फक्त पोटाला लागेल कमीतकमी तेवढेतरी अन्न शासनाने पुरवावे अशी आशा या कठीण परिस्थितीत बेरोजगार झालेले नागरिक करीत आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.