औरंगाबाद | वार्ताहर
औरंगाबाद : येथील घाटी रुग्णालयात दाखल झालेल्या एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा काल रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती ‘घाटी’च्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी दिली.
रात्री दहा वाजता त्यांच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना दमा, खोकला, मधुमेह, आदी आजार होते त्यांना काल रविवारी दुपारी गंभीर अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वाशोच्छासह उपचार सुरू होते. मागील तीन वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रात्री उशिरा दहा वाजचा त्यांच्या कोवीड-१९ च्या अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर साधारण 1 तासाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅट्रल न्युमोनिया डयू टू कोव्हीड-१९ इन केस विथ डायबिटीस मेलआयटस हा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांचा हा दहावा मृत्यू असून, काल रात्रीपर्यंत एकूण रुग्ण संख्या २८३ एवढी होती.
आतापर्यंत झालेले मृत्यू
५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
१४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
१८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
२१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
२२ एप्रिलला हिलाल कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू.
२७ एप्रिलला किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू
२८ एप्रिललाही किलेअर्क येथील ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू
१ मे गारखेडा येथील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू.
२ मे नूर कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
३ मे सातारा-देवराई परिसरातील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

Leave a comment