फर्दापूर पोलिस ठाण्यात बारा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल
फर्दापूर । वार्ताहर
शेताच्या रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी होवून या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या शेरसिंग गोबरु बातळे(45) यांचा वैद्यकीय उपचारासाठी नेतांना रस्त्यातच मृत्यू झाला ही घटना रवळा (ता.सोयगाव) येथे दि.2 शनिवार रोजी घडली आहे याप्रकरणी बारा जणांन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेत नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे रवळा गावा सह सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या परीसरात काही काळ तणाव निर्माण झाल्याचे दि.2 रविवार रोजी दिसून आले रवळा गावात रविवारी सकाळ पासूनच फर्दापूर-अजिंठा व सोयगाव पोलिसांन सह राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने संपूर्ण रवळा गावास पोलिस छावणी चे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की रवळा(ता.सोयगाव)शिवारातील गट क्रमांक 71 मध्ये मयत शेरसिंग गोबरु बातळे व आरोपी धनंजय हरसिंग बातळे यांची शेती आहे दोन्ही कुटुंबान मध्ये शेताच्या बांधावरील रस्त्यावरुन वाद आहे दरम्यान दि.2 शनिवारी मयत शेरसिंग गोबरु बातळे यांनी त्यांच्या शेतातील मकाचे पिक काढून ते ट्रॅक्टर मधून घरी घेवून जात असतांना आरोपी धनंजय हरसिंग बातळे व त्याचे नातेवाईक तेथे आले व त्यांनी रस्त्याचा जुना वाद उकरून काढत भांडणाला सुरुवात केली या भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने आरोपी धनंजय बातळे व त्यांच्या नातेवाईकांनी मिरची पूड,लोखंडी चिमटा व काठ्याच्या साह्याने शेरसिंग बातळे व त्यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण केली या हाणामारीत शेरसिंग गोबरु बातळे,जयवंताबाई शेरसिंग बातळे,जोरसिंग गोबरु बातळे व सबोताबाई गोबरु बातळे हे गंभीर जखमी झाले,दरम्यान लोखंडी चिमट्याचा मार शेरसिंग गोबरु बातळे यांच्या डोक्यात मानेवर व कंबरात लागल्याने गंभीर अवस्थेत त्यांना बुलढाणा येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी औरंगाबाद कडे रवाना केले असता औरंगाबाद ला पोहचण्यापूर्वीच वाटेतच बदनापूर जवळ त्यांचा मृत्यू झाला,दरम्यान रविवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे मयत शेरसिंग गोबरु बातळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले मात्र यावेळी मयताच्या नातेवाईकांनी जो पर्यंत आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांनी नातेवाईकांची समजूत काढूण आरोपींना दोन दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिल्याने हा तिढा सुटून अखेर पोलिस बंदोबस्तात मयत शेरसिंग गोबरु बातळे यांच्यावर रवळा येथे अंतिम संस्कार करण्यात आला. या प्रकरणी शुभम शेरसिंग बातळे(रा.रवळा ता.सोयगाव) यांच्या फिर्यादी वरुन फर्दापूर पोलिस ठाण्यात आरोपी धनंजय हरसिंग बातळे,सुरेश हरसिंग बातळे,मेरसिंग हरसिंग बातळे,हरसिंग हरचंद बातळे,अक्षय संजय बातळे,नितेश मेरसिंग बातळे,मनिषा धनंजय बातळे,फुलाबाई हरसिंग बातळे,यशोदा मेरसिंग बातळे,रेवताबाई संजय बातळे,शेनसिंग ईश्वर बातळे,सुरेखा शेनसिंग बातळे(सर्व रा.रवळा ता.सोयगाव) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment