पाचोड । विजय चिडे
औरंगाबाद शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता विविध ठिकाणी विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाचोड ता.पैठण ग्रामीण रुग्णालयात येथे विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून . उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी नव्याने निर्माण होणार्या 30 खाटांच्या कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी प पाचोड परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पाचोड ग्रामीण रुग्णालय ट्रामा केयर सेंटर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कोविड-19 हेल्थ सेंटर, चेक पोस्ट आणि शासकीय गोदामाला त्यांनी भेट दिली. कोरोना उपाययोजनांची माहिती देताना उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता विविध ठिकाणी विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाचोड ग्रामीण रुग्णालयात येथे विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी नव्याने निर्माण होणार्या 30 खाटांच्या कोविड हेल्थ सेंटरची पाहणी करून. त्यासाठी लागणारी साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याची हमी मोरे यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुधीर पोहरेगावकर, डॉ.बाबासाहेब घुगे, डॉ.राहुल दवणे, डॉ.रोहित जैन, डॉ.सोनाली गोंडगे हे उपस्थित होते.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथील चेक पोस्टलाही मोरे यांनी भेट दिली. तेथील पोलीस कर्मचार्यांशी संवाद साधला. मालवाहतूक करणार्या वाहनांना अडवू नये, अशा सूचनाही दिल्या. त्यानंतर स्वप्नील मोरे यांनी पाचोड येथील शासकीय गोदामातील धान्य साठ्याचा आढावा घेतला. नागरिकांना रेशन देताना कुठलीही अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गोदाम कर्मचार्यांना मोरे यांनी दिल्या आहे.
Leave a comment