सोयगाव । वार्ताहर
कोरोना संसर्गाचा उपाय योजनांचा आढावा आणि विशेष सूचना देण्यासाठी रविवारी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी तहसील कार्यालयात आढावा घेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी प्राथमिक आढावा सादर करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास डोंवाने यांनी उपाय योजनांचा आढावा गावनिहाय दिला.
अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सोयगाव तहसील कार्यालयात कोरोना संसर्गाच्या उपाय योजनांचा आढावा घेवून परराज्यातील आलेले मजूर आणि परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांची तपासणी करण्याबाबत माहिती घेत लॉकडाऊन काळात वाटप केलेल्या धान्य वितरणाबाबत माहिती घेतली यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,नायब तहसीलदार शेख मकसूद आदींची यावेळी उपस्थिती होती.आढावा बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी फर्दापूर ता.सोयगाव येथील कोविड काळजी केंद्राची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.
Leave a comment