दोन दिवसाचे 100% लॉकडाऊन यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार-सपोनि किरण बिडवे
भराड़ी । वार्ताहर
सध्या संपूर्ण जगभरात कोरोणा व्हाईरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असुन यामुळे सर्वच प्रशासकीय यंञणा कोरोणावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे.औरंगाबाद शहर हे रेडझोनमध्ये आलेले असुन दिवसेंदिवस कोरोणा रोगाचा संसर्ग वाढतच असल्याने औरंगाबाद शहरात कोरोणा रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे तर काही रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.कोरोणा रोगाचा प्रसार ग्रामीण भागात होऊ नये यासाठी मा.पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत गुरूवार व शुक्रवार या दोन दिवसी 100% लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते.
यावेळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सरपंच व पोलीस पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात दवंडी व अलाऊसींग करून सर्व नागरिकांनी घरीच थांबु पोलीस प्रशासनाला 100% लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.गुरूवार रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातअंतर्गत गावात लॉकडाऊन 100% शांततेत यशस्वी झाल्यानंतर शुक्रवार रोजी भराडी येथील बसस्थानकावरील नाक्यावर भराडी बिट जमादार विठ्ठल चव्हाण व पोलिस कर्मचारी संदीप कोथलकर यांच्याकडून नाक्यावरून जाणा-या प्रत्येक वाहनांची व नागरिकांची कसून तपासणी केली जात असल्याने सर्वच नागरिकांनी घरीच थांबुन प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विकास आडे हे पोलीस कर्मचा-यांसह ठाण्याअंतर्गत येणा-या गावात गस्त घालुन सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करत होते.गुरूवार व शुक्रवार या दोन दिवसी ग्रामीण भागातील नागरिक घरीच थांबले किराणा दुकाने,कृषी दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवुन पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल सर्व जनतेचे आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी मानले. यावेळी एस पी ओ सोमीनाथ गोरे,गणेश खोमणे,नारायण महाजन आदींनी परिश्रम घेतले.
Leave a comment