12000 पेक्षा अधिक फुड पँकेज चे झाले वितरण
औरंगाबाद । वार्ताहर
शहरात अनेक सामाजिक, धार्मिक, व स्वंयसेवी संस्था आजच्या कोरोना आणी लाँकडाऊन च्या दरम्यान मानवसेवेचे कार्य करीत आहे गरजु पर्यत अन्नधान्य,औषधी,जेवण पुरवित आहे.या मध्ये सुनोयोजित पध्दतीने एक दिवस अगोदर आखणी करुन दुसर्या दिवशी थेट त्यांच्या पर्यत जाऊन त्यांच्या स्वादीष्ठ पोटभर जेवणाची व्यवस्था करण्यात आजच्या घडीत शांती नाहीतर पाण्याची बाटली सुध्दा दिली जात आहे दररोज पुरी भाजी,आणी मसाला राईस हा मेनू राहतो शांती फाऊंडेशन च्या स्वंयसेवकांचा दिवसच त्यांच्या स्वंयपाक घरात निघतो अस म्हतल्यास वावगे ठरणार नाही.
रेल्वे स्टेशन रोड, पैठण रोड,जालना रोड, मोंढा, मोंढा नाका, या शहरातील भागा सोबतच अत्यावश्यक सेवा देणारे वाहन चालक, सफाई कर्मचारी, पोलीस, यांच्या सोबचत काही स्वंयसेवक थेट जालन्यापर्यत जेवणाचे डबे गाडीत टाकुन फिरत आहे. मागील वीस दिवसापासुन सुरु असलेला हा उपक्रम हा मानवतेता महायज्ञ तीन मे पर्यत चालणार असुन 25000 नागरीकांची पोटाची भुख भागविण्याचा संकल्प शांती गृप ने केला आहे. दररोज स्वादीष्ठ पोलीभाजी व पुलाव हा मेनु असतो. या उपक्रमाचे प्रोजेक्ट प्रमुख म्हणुन वैभव डुंगरवाल व अजिंक्य शिंगवी असुन त्यांना योगेश नाबरीया, गोपि निकम,सचिन समदडीया,भरत कदम यांची मोलाची साथ लाभत आहे. दररोज या जेवणाच्या पाकीटाची पँकीग आणि वितरणाची महत्वपूर्ण भुमिका मिल्लुभाई चावरीया मित्र मंडळ (जागृत हनुमान मंदीर गांधी नगर) मंडलाचे 40 सदस्य परिश्रम घेत आहे.
गृपचे उपक्रम-शांती ग्रुप फाऊंडेशन ने दोन वर्षापुर्वा दृष्काल ग्रस्त भागात व शहरातील अनेक भागात 350 पेक्षा अधिक टँकरपाणी वितरीत केले. संपुर्ण मराठवाड्यात सर्वात मोठे रक्तदान शिबीर दरवर्षी आयोजीत केले जाते ज्यामध्ये आज पर्यंत पाचँ हजार रक्तपिशवीचे संकलनाचा रेकार्ड गृपच्या नावावर आहे. गौशालेत नियमीत चारा ग्रुपच्या वतीने टाकण्यात येतो. शांती ग्रुपच्या या सर्व सामाजिक उपक्रमासाठी मनोज सिंघवी, आशिश सिसोदिया, महावीर नहार, अतुल कासलीवाल, केतन साहुजी, राकेश पांडे, विशाल कांकरीया, मनोज चोपडा, महेंद्र बंब, डॉ.जितेंद्र कासलीवाल, विनोद तापडीया, संदीप संचेती, उमेश देवडा, राहुल बोरा सह संपुर्ण शांती ग्रुप व शांती फाऊंडेशनचा नेहमी सक्रीय सहभाग असतो.
Leave a comment