जंगलातांडा येथील धक्कादायक प्रकार
फर्दापूर । वार्ताहर
अवैध गावठी दारु विक्री बंद करण्याची मागणी करणार्या सामाजिक कार्यकर्त्यास गावठी दारु विक्रेत्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार दि.1 शुक्रवार रोजी जंगलातांडा(ता.सोयगाव) येथे घडला असून या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या बाबत अधिकृत वृत्त असे की फर्दापूर पोलिस ठाणे परीक्षेत्रातील जंगलातांडा येथे मागील विस वर्षापासून नागरीकांनी दारु बंदी केली होती मात्र कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉक डाऊन होवून परवाना धारक दारु दुकाने बंद झाली परीणामी काळ्या बाजारात दारुची मागणी वाढल्याने ग्रामीण भागात चारपट दराने अवैध गावठी दारु विक्रीला पेव फुटल्याचे दिसून येत असल्याने याबाबीचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करीत जंगलातांडा गावात काही जणांनी अवैधरीत्या गावठी दारु विक्री अड्डे सुरु केले दरम्यान या सर्व प्रकाराला सामाजिक कार्यकर्ते पारसिंग जव्हरसिंग चव्हाण यांनी विरोध दर्शवित दि.29 एप्रिल रोजी फर्दापूर पोलिस ठाण्यात निवेदन देवून जंगलातांडा येथे सुरु झालेली अवैध गावठी दारु विक्री बंद करण्याची मागणी केली होती दरम्यान याबाबीचा राग मनात धरुन दि.1 शुक्रवार रोजी पारसिंग जव्हरसिंग चव्हाण हे गावातील एका ओट्यावर बसलेले असतांना गोंधीबाई सांडू राठोड व संजय सांडू राठोड या दौघांनी पारसिंग चव्हाण यांना शिवीगाळ करीत आम्ही गावठी दारु विकतो म्हणून तू आमचे नाव पोलिसांना का सांगितले असे म्हणत मारहाण केल्याची तक्रार पारसिंग राठोड यांनी फर्दापूर पोलिस ठाण्यात दिली आहे त्यांच्या तक्रारी वरुन गोंधीबाई सांडू राठोड व संजय सांडू राठोड(दोघे रा.जंगलातांडा ता.सोयगाव) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment