औरंगाबाद । वार्ताहर

जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना खरीप हंगामासाठी आवश्यक ते बी-बियाणे, खतांसह सर्व सुविधा सुलभतेने उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत बी-बियाणे, खताच्या विक्री प्रक्रियेचे प्रभावी नियोजन  असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. बैठकीस राज्य फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके यांच्यासह खा. इम्तियाज जलील,  भागवत कराड, सर्वश्री आमदार हरीभाऊ बागडे, प्रदिप जैस्वाल, संजय शिरसाठ, सतिश चव्हाण, अतुल सावे, प्रशांत बंब, नारायण कुचे, विक्रम काळे, अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत, प्रा.रमेश बोरणारे यांच्यासह जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद  यांच्यासह इतर मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर इतर जिल्हास्तरीय अधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री यावेळी म्हणाले, या वर्षी चांगले पर्जन्यमान असण्याचा अंदाज वर्तवला जात असून शेतकरी बांधवांसाठी ही चांगली बाब आहे. त्या पाश्वर्भूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खत,बी-बियाणे यांचा पूरेसा साठा शेतक-यांना उपलब्ध करुन द्यावा. दुकानदारांकडून  प्रकारे शेतक-यांची लूट होणार नाही याची काळजी घ्यावी. विनागर्दी शेतक-यांना गरजेच्या गोष्टी उपलब्ध होण्यासाठी तसेच पीक पेरणीसाठी सर्व आवश्यक ते सहकार्य करुन खरीप हंगामात शेतक-यांनी उत्साहाने सहभागी होण्यासाठी यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे. शेतक-यांना नवीन कर्जासाठी आधी घेतलेल्या कर्जातील बाकी राहीलेल्या परतेफेडीमुळे कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही यासाठी विशेषत्वाने खबरदारी  कापूस खरेदी प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली असून ती गतिमान करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधितांना दिले.

जिल्ह्यातील शेतक-यांच्या वीज जोडणीच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ऊर्जामंत्र्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पोकरा योजनेंतर्गत अधिक शेतक-यांना लाभ देण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी देखील  करण्यात येईल.लोकप्रतिनिधीं दिलेल्या विविध सूचनांची योग्य ती दखल घेत शेतक-यांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भरीव उपाययोजना राबवण्यात येईल. या अडचणीच्या काळातुन आपल्या सगळ्यांना समन्वयाने एकमेकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या बाहेर पडायचे आहे. शासन शेतक-यांच्या पाठीशी असून जिल्ह्यात पूरेशा खताचा, बी-बियाणांचा साठा उपलब्ध आहे. त्याचे योग्य नियोजन करुन शेतक-यांना तो सुलभतेने सुरक्षितरित्या उपलब्ध  द्यावा, असे श्री. देसाई यांनी संबंधितांना सांगितले. शेतक-यांचा कापूस प्राधान्याने तातडीने खरेदी करण्याच्या सूचना जिनिंग व्यवस्थापकांना द्याव्यात. खत,बी-बियामे खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होणार नाही यासाठी कृषी विभागाने योग्य ती पूर्वतयारी करुन ठेवावी. तसेच खत, बी-बियाणे  खरेदीसोबत काही कंपन्या, दुकानदार इतर काही गोष्टी खरेदी  जबरदस्ती शेतक-यांना करणार नाही यासाठी ही कटाक्षाने यंत्रणांनी लक्ष द्यावे. भरारी पथके नेमावीत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना उपयुक्त असून तीची व्याप्ती वाढवावी. तसेच पालकमंत्री रस्ते योजनेतर्गत गावातील रस्त्यावर रोहयोच्या कामातुन खडीकरण करुन घ्यावे जेणेकरुन जिह्यातील सर्व ग्रामीण रस्ते चांगले होतील, अशा सूचना, खा. जलील, आ. बागडे आ. कुचे,  बोरणारे,आ. राजपूत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी केल्या. त्याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी संबंधितांना दिल्या. गुणवत्ता नियंत्रण अभियान सन 2020 -21 अंतर्गत जिल्ह्यात बियाणांचे 535, खतांचे 564  कीटकनाशकांचे 231 नमुने काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सन 2019 -20 मध्ये एकूण 1804 कृषी पंपांना विद्युत जोडणी देऊन विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियानांतर्गत 2020-21 हे जमीन आरोग्य पत्रिका योजनेचे अंतिम वर्ष असून  2019-20 मध्ये 28,537 मृद नमुन्यांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत प्रभावीरित्या नियोजन करण्यात येत असून शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमातून आतापर्यंत दिड कोटी पेक्षा अधिक फळ भाजीपाला विक्री झाला  असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मोटे यांनी यावेळी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.