केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन

कोरोना पार्श्‍वभुमिवर घरपोच मिळणार भाजीपाला, फळे व किराणा

जालना । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून जनतेची अटोकाट सुरक्षा करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन करुन नागरीकांनी घरातच राहुन कोरोनाला हरवण्याचे आवाहन सरकार करीत आहे. सरकारच्या आवाहनाला नागरीक प्रतिसाद देत असून नागरीकांना घरीच राहुन त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तुंचा पुरवठा करण्याचा उपक्रम हॅप्पी इंडीयन मार्टच्या वतीने सुरु करण्यात आला आहे.  केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील  दानवे, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्यालन, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते नुकतेच या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोनामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. हा उपक्रम अत्यंत चांगला असून तो नियमीत सुरु ठेवा, त्यामुळे जनतेला घराबाहेर न पडता घरी बसूनच दैनंदिन गरजेच्या वस्तु घरपोच मिळू शकतात असे केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी म्हटले असून हॅप्पी इंडीयन मार्टच्या उपक्रमाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ केला. यावेळी काही मदत लागरी तर करण्याचे आश्वासन देखील ना. रावसाहेब दानवे यांनी दिले.  घरपोच सेवा देण्याचा उपक्रम अत्यंत चांगला असून कोरोनापासून सुरक्षीत राहुन व सुरक्षीत पध्दतीने ही सेवा पुरवावी. प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी. असे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी म्हटले असून त्यांनी हॅप्पी इंडीयन मार्टच्या संकेतस्तळाचा शुभारंभ केला.

कोरोनाची भिती वाढली आहे. त्यामुळे अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. जनतेला घरपोच आणि चांगला भाजीपाला देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम छान आहे. हॅप्पी इंडीयन मार्टच्या संकेतस्तळाचे अवलोकन करुन त्यांचा शुभारंभ आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी केला. या उपक्रमामुळे नागरीकांना घराच्या बाहेर न पडता घरी बसूनच दैनंदिन गरजेच्या वस्तु मागवता येतील व जनतेनेही घराबाहेर न पडता ऑनलाईन भाजीपाला घरपोच मागवावा असे आवाहन आ. कैलास गोरंट्याल आणि जालना नगर पालीकेच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी केले. जालना जिल्ह्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन लॉकडाऊन काळात घरपोच भाजीपाला व फळे देण्याची सुविधा करणे हा एक अभिनव उपक्रम आहे. नागरिकांनी या शेतकरी पुत्रांकडून खरेदी करुन ताजा व शुद्ध भाजीपाला खरेदी करावा. असे मत माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केले.

कोरोनामुक्तीसाठी सरकार अटोकाट प्रयत्न करीत आहे. कोरोना पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये कुणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला, फळे व किराणा माफक दरात देण्यासाठी जालना येथील काही तरुणांनी एकत्र येऊन हॅप्पी इंडियन मार्टची सुरुवात झाली आहे.  हॅप्पी इंडियन मार्ट संकेतस्थळावरुन ऑनलाईन फळे, भाजीपाला व किराणा घरपोच मिळण्याची सुविधा सुरु झाली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतातून ताजा भाजीपाला व फळे यामाध्यमातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जात असल्याने जालना जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी व उद्योजकांसह सर्वसामन्य नागरिकांनीही या तरुणांच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही या उपक्रमाचे स्वागत करुन  नागरिकांना ऑनलाईन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.