माजलगाव | उमेश जेथलिया
     माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवड 14 मे रोजी होणार असून बहुमत असल्यामुळे आ प्रकाश सोळंके कोणाच्या नावाला पसंती देतात यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे. पंचायत समिती चे माजी सभापती जयदत्त नरवडे की नवा चेहरा डॉ उद्धव नाईकनवरे यांना संधी मिळणार की पुत्र प्रेम आडवे येणार की पुन्हा धक्का तंत्र वापरून नवा चेहरा आ प्रकाश सोळंके देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


          आ प्रकाश सोळंके यांचा राजकीय अभ्यास, मताची गोळाबेरीज, जातीची गणित व विरोधकांच्या तोफेला उत्तर देणारा सभापती अस एकूण गणित जुळुनच सभापती निवडला जाण्याची शक्यता आहे.आज घडीस दुसऱ्या फळीत अशोक डाक व जयदत्त नरवडे खरं तर या स्पर्धेत वरचढ आहेत मात्र अशोक डक हे मुबंई बाजार समितीच्या सभापती पदी पुन्हा आरूढ होण्याचे संकेत आहेत.जयदत्त नरवडे हे आ प्रकाश सोळंके यांचे किचन कॅबिनेट असून अनुभवी,काना खालचा, राजकीय व जातीच्या गणितात त्यांची बाजू उजवी असली तरी विरोधकांना नामोहरम करण्याची कला अवगत नसणे किंवा फ्रंट वर येऊन काम न करणे ,आ सोळंके ना सोडून गेलेल्याशी असलेली मैत्री त्यांच्या पदाला अडसर ठरू शकतात.
       सभापती पदासाठी डॉ उद्धव नाईकनवरे हे नवा चेहरा ,कोरी पाटी,नाईकनवरे आडनाव म्हणून पसंती मिळू शकते असा राजकीय अंदाज आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा अनेक शिलेदार आ सोळंके ना सोडून जावु लागले त्या पडत्या काळात डॉ नाईकनवरे यांनी आपल्या भावसह आ प्रकाश सोळंके चे जीवतोडुन काम केले शिवाय ज्या शेलापुरी व रेंनापुरी चे 100%मतदान नितीन नाईकनवरे यांच्या मागे जाते तिथे डॉ नाईकनवरे यांनी 40%मतदान आ सोळंके च्या पारड्यात टाकले.शिवाय कसलेही 'आव्हान' पेलण्याची असलेली तयारी विरोधकांना नामोहरम करणे असो एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांना पसंती मिळेल असा कयास राजकीय वर्तुळात आहे.ग्रामीण भागात आव्हान संघटनेच्या माध्यमातून तयार केलेले वर्तुळ ही मोठे आहे 
     आ प्रकाश सोळंके हे या निवडीसाठी धक्कातंत्र वापरून भागवत शेजुळ किंवा एखादा नवीन चेहरा सभापती म्हणून देतात की नाही नाही म्हणून पुन्हा पुत्रप्रेम उफाळून वीरेंद्र सोळंके यांना या पदावर विराजमान करतात हे 14 मे रोजी कळेलच

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.