शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल; शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

बीड । वार्ताहर

 मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती व शांतता रॅलीचे उद्या दिनांक 11 जुलै बीडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी लाखों मराठा समाजबांधव बीड शहरात येण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागाकडून बीड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच बीड शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे बीड शहरासाठी सर्व माध्यमांच्या शाळांना 11 जूलै रोजी एक दिवसाची सुट्टी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. दिनांक 11 जुलै रोजी बीड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने व गर्दी होणार आहे. त्यामुळे बीड शहरातील सर्व रस्ते गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद आहेत. तशी सूचना पोलीस अधीक्षक,  यांनी दिली आहे. सदर सूचनेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानुसार बीड शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 11 जुलै रोज गुरुवार एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.