बीड । सुशील देशमुख
जिल्ह्यात पावसाचा जोर तिसर्यादिवशीही कायम राहिला. तसेच मागील तीन दिवसात जिल्ह्यात 7 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दुसरीकडे मात्र अजूनही जिल्ह्यातील 143 प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून काही प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेलेली आहे. माजलगाव या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पातही सध्या उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.(visit us:www.lokprashna.com)
गत 24 तासात परळी तालुक्यात सर्वाधिक 47.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच या तालुक्यातील सिरसाळा महसूल मंडळात (65.8 मि.मी. व पिंपळगाव महसूल मंडळात (73.5 मि.मी.) अतिवृष्टी झाली आहे.बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे.बुधवारी (दि.17) सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 15.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (visit us:www.lokprashna.com)या दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा व पिंपळगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
मागील चोवीस तासात परळी तालुक्यात सर्वाधिक 47.4 मिलिमीटर पाऊस झाला. बीड तालुक्यात 14, पाटोदा 2.7, आष्टी 0.3, गेवराई 7.7, माजलगाव 26.9, अंबाजोगाई 16.3, केज 9.6, धारूर 32.9, शिरुरकासार 2.8 आणि वडवणी तालुक्यात 40.4 मिलीमीटर पाऊस झाला आहे.बीड जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी 566.1 मिलिमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सध्या जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत पडणार्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत 325.8 मिलिमीटर (57.6) टक्के पाऊस झाला आहे. उडीद, मूग या तिमाही पिकासाठी हा पाऊस महत्वाचा मानला जात आहे.या पावसामुळे शेत शिवारात पाणी साचले आहे.
तीन दिवसात या सात महसूल मंडळात अतिवृष्टी
दि.14 जुलै रोजी बीड तालुक्यातील नवगण राजुरी व पिंपळनेर तसेच वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर 15 जुलै आष्टी तालुक्यातील कडा व धामणगाव येथे अतिवृष्टीची नोंद झाली होती, तिसर्या दिवशी म्हणजेच 16 जुलै रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा,पिंपळगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. (visit us:www.lokprashna.com) एकंदरीतच जिल्ह्यात पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असून तीन दिवसात 7 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
Leave a comment