राजकारण आणि समाजकारणात कार्यरत असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांना समजून घेताना त्यांचे प्रश्न सोडवताना नेता म्हणून कार्य करणारे व्यक्तिमत्व हे बहुआयामी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान करणारे असावे लागते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संघर्षमय वाटचाल केली; मात्र या काळात त्यांनी त्यांचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी कधीही संपर्क तुटू दिला नाही. नव्हे तर कार्यकर्ता हेच माझे टॉनिक असल्याचे पंकजाताईंनी सातत्याने बोलून दाखवले. कार्यकर्त्यांमधून आपल्याला समाजकारण करण्याची ऊर्जा मिळते असे सांगत पंकजाताईंनी सातत्याने कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच समाजकारण आणि राजकारणात आपण पुढे वाटचाल करणार असल्याचे आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीतून दाखवून दिले आहे.

 

पक्षामध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्याला मानसन्मान देतानाच योग्यवेळी योग्य ठिकाणी संधी मिळवून देत कार्यकर्त्यालाही नेता करण्याचे काम खर्‍या अर्थाने पंकजाताई मुंडे यांनी मागील 15 ते 20 वर्षांच्या राजकारणातून केले आहे. म्हणूनच आज स्व.गोपीनाथराव मुंडे यांची कन्या म्हणून त्यांना लोक आदराने लोकनेत्या ‘पंकजाताई साहेब’ अशी उपाधी देतात. यामागे पंकजाताई मुंडे यांनी सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा मिळवलेला विश्वास आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ता असो की,शहरी भागातील प्रत्येकांचे प्रश्न वेगळे असतात. त्यासाठी त्या कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेतानाच ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही करता येईल त्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात काम केले आहे.

 
 
 

नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मिळालेले बळ कार्यकर्त्याला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देत असते.असेच कार्य पंकजाताई मुंडे यांच्याकडून सातत्याने होत आहे. अगदी संघर्षाच्या काळातही हताश आणि निराश न होता आपला कार्यकर्ता कायम सकारात्मक आशावादी राहिला पाहिजे आपण केलेले संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कार्यकर्त्याला कायम उत्साही ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी कार्य केलेले आहे.म्हणूनच त्या खर्‍या अर्थाने कार्यकर्त्यांना मानसन्मान व प्रतिष्ठा देणार्‍या लोकनेते ठरल्या आहेत आज पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरामय आरोग्यदायी शुभेच्छा.

 

 

 

-अशोक लोढा

(मा.जि.प.सदस्य, चौसाळा)

बीड विधानसभेसाठी अशोक लोढा प्रबळ दावेदार

नसेवेचे व्रत घेऊन राजकारण करणार्‍या लोढा परिवाराची बीड मतदार संघात मजबूत पकड आहे. मागील 46 वर्षांपासून लोढा परिवार बीड मतदार संघात जनसेवेत आहे. एक परिवार म्हणून काम करत असताना या परिवाराने अगदी ग्रामपंचायत स्तरावरून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतानाच विकासाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती,जिल्हा परिषद सदस्य, आमदार अशा विविध पदांवर लोढा परिवारातील सदस्यांनी काम केलेले आहे. विद्यमान मा.जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले अशोक लोढा हे आता बीड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

 

लोकनेते पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्याशी त्यांचे असलेले कौटुंबिक संबंध तसेच लोढा परिवाराविषयी बालाघाटासह बीड मतदार संघात असलेली सहानुभूती आणि या परिवाराने कायम सर्व,जाती, धर्माच्या घटकांना सोबत घेऊन केलेले विकासाचे कामे यामुळे आता या विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक लोढा हे बीड विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.त्यांच्या या दावेदारीसाठी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे आपली ताकद खर्च करून ही उमेदवारी अशोक लोढा यांना मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करतील अशी आशा अशोक लोढा यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आहे.

 

 सन 1972 पासून लोढा परिवाराने बीडच्या राजकारणामध्ये सक्रियतेने काम केलेले आहे. 1979 साली अशोक लोढा यांचे वडील श्री स्व.चांदमलजी लोढा यांनी बीड पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले होते. त्यानंतर 1980 मध्ये ते पुलोद सरकारमध्ये चौसाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या आमदारकीच्या कालावधीमध्ये चौसाळा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अमुलाग्र योगदान दिले. 1992 ते आजपर्यंत संपूर्ण लोढा कुटुंबीयाने समाजकारण, राजकारणामध्ये सक्रियतेने सहभाग नोंदवत जनसामान्यांच्या समस्या मार्गी लावल्या. स्व. सतीश लोढा यांनी बीड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले, तर त्यांच्या पत्नी छायाताई लोढा या चौसाळा जि.प. गटातून निवडून आल्या होत्या. या जिल्हा परिषद गटातील विविध कामे त्या काळात मार्गी लावताना निधी मंजूर करून आणला होता. त्यानंतर सतीश लोढा यांच्या स्नुषा सौ. सोनाली नितीन लोढा यांना चौसाळा ग्रामस्थांनी सरपंचपदी निवडून दिले. त्यांच्या सरपंच पदाच्या काळात ग्रामविकासाच्या विविध योजना मार्गी लागल्या.

 

 

याच कालावधीत अशोक लोढा यांनी परिवारातील सदस्य म्हणून समाजकारणामध्ये योगदान दिले. 2017 मध्ये अशोक लोढा यांनी चौसाळा जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना जि.प. गटातील मतदारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून देत चौसाळा गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या संधीचे अशोक लोढा यांनी सोने करून या जि.प. गटातील विविध प्रश्न मार्गी लावले. 2022 पर्यंत चौसाळा जि.प.गटाचे सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण विकासाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. रस्ते, स्मशानभूमीचे प्रश्न, तसेच चौसाळा ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठी अशोक लोढा यांनी जिल्हा परिषदेत बैठकीत ठराव घेऊन सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.

 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी गटनेता म्हणूनही काम पाहिले. या कालावधीत ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडतानाच जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी व पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम त्यांनी केले. विविध प्रश्नांची अभ्यासूपणे मांडणी करत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून तेव्हाचा बहुमान अशोक लोढा यांना मिळालेला आहे.घरामध्ये वडिलांनी आमदार म्हणून काम करत असताना समाजकारण आणि राजकारणाचे दिलेले बाळकडू सोबत असल्याने केवळ जनसेवा आपल्या हातून घडावी आणि या क्षेत्रात माध्यम म्हणून काम करता यावे हे स्वप्न उराशी घेऊन अशोक लोढा यांनी आजपर्यंत काम केलेले आहे.

 
 
 

बीड मतदार संघातील जनता याची साक्षीदार आहे.लोढा परिवाराने सहकारी साखर कारखाना, पतसंस्था, शाळा, गोशाळा इत्यादी संस्थांच्या माध्यमातून जनसेवेची नाळ जोडलेली आहे. तसेच चौसाळा ग्रामपंचायतमध्ये सध्या मंगलताई प्रेमचंद लोढा या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. लोढा परिवाराची ही सर्व राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता येत्या विधानसभा निवडणुकीत अशोक लोढा बीड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रबळ दावेदार असू शकतात अशी अपेक्षा आता त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांसह जनतेत आहे. लोढा यांची एकंदर राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांचे समाजसेवेचे कार्य लक्षात घेता लोकनेत्या पंकजाताई मुंडे या येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बीडमधून पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतील, अशी अपेक्षा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांना आहे. येणार्‍या काही दिवसातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे अशोक लोढा हे बीड मतदार संघातून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
 

 
 
 
 
 
 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.