बीड । वार्ताहर

राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांचया संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका,तूर,चना, मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.

 

नाफेड कार्यालयाने गृह आणि सहकार मंत्री यांच्या हस्ते शेतक-यांच्या नोंदणीसाठी लीराीक्षववहळ पोर्टल सुरु केले असून नाफेडमार्फत राबविण्यात येणा-या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा व जास्तीत जास्त शेतक-यांनी ई समृध्दी  पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा, याकरिता पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.


सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करुन अथवा https://esamridhi.in/login या संकेत स्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी पूर्व नोंदणी करावे व केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन   राज्य सहकारी पणन महासंघामार्फत सर्व शेतकर्‍यांना करण्यात आले आहे.

ई-समृध्दी पोर्टलवरील नोंदणीच्या अडचणीबाबत व अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी विलास मारुतीराव सोमारे मोबाईल नंबर 8108182950 एनईएमएल कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीधर कानडे 9561717175 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.