कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे मांडणार माजी मंत्री आ.लोणीकर यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

जालना । वार्ताहर

भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष असून पक्षांमध्ये पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही ही भावना भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज बोलून दाखवली भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी भारतीय जनता पार्टीची लोणीकर यांच्या कोट्यातील कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी बैठकीला भाजपा युवा मोर्चाचे संघटन महामंत्री राहुल भैया लोणीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा शिंदे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब कदम विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे  भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील आरदड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र धोका भाजपा महिला मोर्चाच्या कमलताई तुले भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव भाजपा जालना तालुकाध्यक्ष प्रकाशराव टकले भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश राव निरवळ भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेशराव भापकर भाजपा विद्यमान जिल्हा चिटणीस अशोकराव बरकुले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जालना येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडली काल अचानकपणे समाज माध्यमांच्या द्वारे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी व काही विभागांचे जिल्हाध्यक्ष जाहीर झाल्याचे कार्यकर्त्यांना माहीत झाले त्यानंतर डावलले गेलेल्या व विश्वासात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे समाज माध्यमांवर प्रतिक्रिया मांडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीमध्ये लोणीकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हा शिस्तबद्ध कार्यकर्ता असून कार्यकर्त्यांच्या भावना आपण ऐकून घेणार आहोत व त्या सर्व भावना पक्षश्रेष्ठींकडे आपण पाठवणार आहोत असे यावेळी स्पष्ट केले पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना पदाधिकार्‍यांना विश्वासात घेण्यात आले नसले तरी देखील आपण शिस्तीचे कार्यकर्ते आहोत असे सांगत कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे मांडू आणि निष्ठावान तळमळ असणार्‍या आणि पक्ष कार्यासाठी तत्पर असणार्‍या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास लोणीकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी दिला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या कोट्यातील जाहीर केलेल्या कार्यकारणी मध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा सुजित जोगस तर संघटन सरचिटणीस पदी संपत टकले जिल्हा उपाध्यक्ष पदी गोविंद नामदेव ढेंबरे यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी जिजाबाई जाधव भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी ममता सूर्यवंशी  तर भाजपा महिला मोर्चा जालना जिल्हा संघटन सरचिटणीस पदी स्विटी उर्फ माधुरी दायमा  तर कोषाध्यक्षपदी कौशल्या जाधव यांची निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या संघटन सरचिटणीस पदी कमलताई तुले उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर माऊली शेजुळ तर चिटणीस पदी नारायण पवार यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शहाजी राक्षे यांची निवड करण्यात आली तर जालना भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षपदी क्रांती खंबायतकर व उपाध्यक्षपदी गीता राजगुडे यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली

जिल्ह्यात विश्वासात घेतले गेले नसले तरी पक्षश्रेष्ठी न्याय देईल लोणीकर यांच्या कोट्यातील पक्ष पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

पक्षाने ठरवून दिल्याप्रमाणे मंठा परतुर घनसावंगी जालना ग्रामीण व जालना शहर या पाच मंडळातील लोणीकर यांच्या कोट्यातील क्ष पदाधिकार्‍यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत जिल्हा कार्यकारिणी करताना कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना किंवा पक्ष पदाधिकार्‍यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही ही बाब कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली असून कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांद्वारे आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना पक्षश्रेष्ठींकडे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून पोहोचविल्या जाणार असून पक्षश्रेष्ठी न्याय देईल याचा ठाम विश्वास आहे

राहुल लोणीकर,प्रदेश महामंत्री भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र

यावेळी कीर्ती आर्य  मदनलाल शिंगी सुभाषराव राठोड रमेश महाराज वाघ अंकुशराव बोबडे संजय तौर माऊली शेजुळ डॉक्टर रियाज शेख बंकट सोळुंके राजेश मोरे पंजाब बोराडे नागेश घारे गणेश चव्हाण सुधाकर बोरगुडे शिवाजी पाईकराव नरसिंग राठोड अशोक बरकुले अविनाश राठोड नारायण दवणे संपत टकले विठ्ठल रामा काळे प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे अर्जुन राठोड राजू वायाळ रंगनाथ येवले महेश पवार शिवाजी पाईकराव शिवदास हनवते शत्रुघन कणसे सुशील ढोले बाळासाहेब अमोल गनगे यांच्यासह भाजपा पक्ष पदाधिकारी आणि 300 पेक्षा अधिक सक्रिय सदस्य आणि पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.