बांधकाम कामगारांचे तहसीलदारांना निवेदन 

कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील कोरोना संकटामुळे वाळूचा लिलाव थांबवल्याने   घनसांवगी तालुक्यातील पंधरा ते वीस हजार मिस्री बांधकाम कामगार मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा  प्रश्‍न गंभीर झाला आहे.लेकराबाळानवर उपसामारीची वेळ आली आहे. त्यांना अर्थक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच शासनाने ऑनलाइन शिक्षण पध्दती केल्यामुळे अनेक गोरगरीब  कामगारांच्या मुलांकडे अ‍ॅनराईड  मोबाईल नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . 

शासनाचाही लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याकडे शासनाने दखल घेऊन वाळूचा लिलाव करावा नसता बांधकाम कामगारांना दरमहा दहा 10,000 हजार रुपये बेकारी भत्ता देण्यात यावा व  ऑनलाईन पुढील शिक्षणासाठी मुलांना शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावे व शिक्षणाची सोय करावी शासनाने वरील विषयी गांभीर्याने विचार करून बांधकामगारांना व कामगारांच्या मुलांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे बांधकाम कामगारांनी तहसीलदारांकडे ता.30गुरुवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर बांधकामगार,मजुर कामगार  सय्यद युनूस, ङ्गिरोज कुरेशी, शेख कलीम, शेख इरङ्गान, ङ्गिरोज पठाण, अलीम सय्यद, प्रकाश बोटे , दीपक शिंदे ,जावेद कुरेशी आधी बांधकाम बांधकाम कामगार मिस्त्री यांच्या सह्या आहेत निवेदनाची प्रत  तहसिलदारांमार्ङ्गात मा. जिल्हाधिकारी  मा.पालकमंत्री यांना याबाबत निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. दखल न घेतल्यास बांधकामगार व मंजुर कामगार आंदोलनाचा पावित्रा घेतील....असे त्यानी म्हणटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.