औरंगाबाद । वार्ताहर

प्रत्येकाला काही विशिष्ट मार्गाने आयुष्य जगण्याची इच्छा असते. काहीजणांना राजा सारख आयुष्य जगायचं असत, काही जणांना अत्यंत साधं आयुष्य जगणं आवडत आणि काहींना चित्रपट कथे सारख मालिकेत घडत असणार आयुष्य सत्यात जगायचं असत अगदी शिवराज सारखंच. नाटक, थ्रिल, रोमान्स आणि अँक्शन यांचा खर्‍या जीवनात अनुभव घेता यावा असं त्याला वाटायचं आणि आता त्याने त्याच्या नवीन एमएक्स एक्सक्लुझिव्ह सीरिज - इडियट बॉक्स या सिरीजमधून हे स्वप्न पूर्ण सुद्धा केलं आहे.

हेरगिरी करून, चोरीने प्रेयसी पर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेवटी प्रेयसीच्या होणार्‍या नवर्‍याशी भांडण करणारा आकाश(शिवारज वायचळ) आपल्या आयुष्यातील प्रेम परत मिळवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा एक आगळीवेगळी प्रेमकहाणी आहे. त्याच्या प्रेयसीला परत मिळवण्याचा त्याचा हा शोध आपल्या टीव्ही मालिकेसारखाच मनोरंजक आणि आनंददायी आहे. या सीरिजचा प्रत्येक एपिसोड मनोरंजनाने परिपूर्ण आहे ज्याला लाखो भारतीय टीव्हीवर पाहण्याचा आनंद घेतात.

इडियट बॉक्स बद्दल बोलताना शिवराज वायचळ सांगतो , ही सीरिज पडद्यावर माणसाच्या आयुष्यातील विविध शैलींना आणि आपण लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलेल्या सर्व गोष्टींचा समावेश करते. या सीरिज मध्ये मैत्री , प्रेम , नाटक आणि शक्य त्या सर्व गोष्टी ज्या एखादा प्रियकर आपल्या प्रेयसी ला मिळवण्यासाठी करेल त्यांचा समावेश आहे.  मी हे सर्व अनुभवण्याची इच्छा ठेवूनच या इंडस्ट्री मध्ये प्रवेश केला, वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न या मालिकेच्या 5 भागांनीं खरे केले! मात्र मला काय म्हणायचे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेबसिरीज पहावी लागेल. जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी दिग्दर्शित या मालिकेत शिवानी रांगोळे, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टाकसाळे, प्रवीण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे आणि आशय कुलकर्णी या प्रख्यात तसेच नावाजलेल्या कलाकारांचा समावेश आहे. ही सीरिज मराठी व्यतिरिक्त  हिंदी, तामिळ आणि तेलगु या भाषेत भाषांतरित असून एम एक्स प्लेयर वर इडियट बॉक्स तुम्ही विनामूल्य पाहू शकता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.