विज्ञान शाखेचा 95 टक्के व कला शाखेचा 78 टक्के निकाल

फर्दापूर । वार्ताहर

इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणिकराव पालोदकर उच्च माध्यमिक विद्यालय फर्दापूर(ता.सोयगाव) येथे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत विद्यालयाचा निकाल 88 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 95 टक्के व कला शाखेचा निकाल 78 टक्के एवढा लागला असून सर्व उतीर्ण विद्यार्थी व शिक्षकाचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अभिनंदन केले आहे.

माणिकराव पालोदकर विद्यालय फर्दापूर येथे विज्ञान शाखेतून 133 तर कला शाखेतून 103 विद्यार्थी  अश्या एकूण 236 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती यात विज्ञान शाखेत 133 पैकी 127 तर कला शाखेतून 103 पैकी 81 असे एकूण 208 विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षेत उतीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल 95 टक्के तर कला शाखेचा निकाल 78 टक्के लागला एकूण 236 पैकी 208 परीक्षार्थी उतीर्ण झाल्याने मा.पा उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 88 टक्के एवढा लागला आहे दरम्यान विज्ञान शाखेतून प्रथम शेख फैजुलहक तन्वीर अहमद, द्वितीय शेख जवेरीया अनम जावेद, तृतीय परेश गुजर या विद्यार्थ्यांनी बाजी मारली तर कला शाखेतून नम्रता बाबुराव तडवी,शिवानी सतीश सोनवणे,अंजना सुभाष मगरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटाकवीले आहे.दरम्यान बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार,संस्थेचे अध्यक्ष व सिल्लोड नगरपालिकेचे उपाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, प्रशासकीय अधिकारी रईस खान,संचालक शेख जावेद,मुख्याध्यापक पी.के शिंदे, प्रा. पी.के गीते,वाय.पी लवटे,एस.आर बावस्कर,एस.डी वाणी,एस.के तायडे, एन.टी जाधव,के.आर पाटील आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन करुन  विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.