बीड | वार्ताहर
प्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्या वतीने बीड तालुक्यातील बालाघाट डोंगररांगेत ठिकठिकाणी जलप्याऊ कट्टे अर्थात वन्य प्राण्यांसाठी पानवठे उभारणी केली जाणार आहे. बालाघाटावरील कार्यकर्ते बाळासाहेब मोरे यांनी याबाबत प्रा. सुरेश नवले यांच्याकडे गेल्या काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रा. सुरेश नवले नवले यांनी वन्य प्राण्यांसाठी पानवठे उभारणीसाठी स्वतःहून पुढाकार घेत प्रा सुरेश नवले मित्र मंडळाच्या वतीने शेकडो पानवठे उपलब्ध करून दिले आहेत. या पानवठे उभारणीचा शुभारंभ आज दि. 20 मे रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र तपोवन मोरेश्वर संस्थान कोळवाडी येथील ह.भ.प. तुलसीदास महाराज शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.
तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधार्थ अनेक वन्य प्राण्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अनेकदा जीव गमवावा लागत असल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळेच वन्य प्राणी व पशु पक्षांसाठी सामाजिक भावनेतून प्रा. सुरेश नवले मित्र मंडळाच्या वतीने बालाघाट डोंगररांगेतील मांजरसुंबा, कपिलधारवाडी, मोरदरा, कोळवाडी, आणि बालाघाट डोंगर परिसरात ठिकठिकाणी जलप्याऊ कट्टे अर्थात पानवठे उभारणी केली जाणार आहे. याचा शुभारंभ आज दि.20 मे रोजी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी ह.भ.प. तुलसीदास महाराज शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे. याप्रसंगी ऍड. चंद्रकांत नवले, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, शिवाजीराव जाधव, श्रीमंत उबाळे,ललित अब्बड आदींची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन बाळासाहेब मोरे, यांच्यासह संभाजी कदम, महादेव नाईकवाडे, बाबुराव येडे पाटील, काकासाहेब शिंदे, शहादेव कदम, रुद्र महाकले, भास्कर वाणी पाटील, यांनी केले आहे.
Leave a comment