औरंगाबाद । वार्ताहर
मुंबई महानगर पालिका कायद्यानुसार आज संध्याकाळी सहा वाजता महानगर पालिकेची मुदत संपली आहे. नगर विकास खात्याने प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली होती, ती मान्य झाली आहे.
अखेर आज औरंगाबाद महानगर पालिकेवर प्रशासकाची नियुक्त करणात आली आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणून मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे काम पाहणार आहेत
महानगर पालिका २९ एप्रिल पुर्वी अस्तित्वात येणे कायद्याने बंधनकारक होते. पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आता महानगर पालिकेवर प्रशासक नेमण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादकरांच्या मनात महानगर पालिकेवर प्रशासक नियुक्त करावा, असं होतं. पण तशी परिस्थिती निर्माण होत नव्हती. अखेर कोरोना विषाणूमुळे आता ते शक्य झालं आहे. कारण संपूर्णपणे कोरोनामुक्त महाराष्ट्र होत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक राज्यात होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या जून महिन्यापर्यंत तरी निवडणूक होण्याची शक्यता नाही.
Leave a comment