फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
फर्दापूर । वार्ताहर
लॉक डाऊन व कलम 144 संचारबंदीचे उल्लंघन करीत हॉटेल मध्ये गर्दी जमवून व्यवसाय करणार्या हॉटेल चालका विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दि.25 रोजी रात्रीच्या सुमारास साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या पथकाने औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील हॉटेल न्यू सुरुची येथे केली आहे.कोव्हीड19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन कलम 144 संचारबंदी साथरोग प्रतिबंधीत कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना ही फर्दापूर (ता.सोयगाव) येथील औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील हॉटेल न्यू सुरुची मध्ये कायद्याचे उल्लंघन करुन हॉटेल मध्ये गर्दी जमवून व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार नूकताच उघडकीस आला आहे.
या बाबत पोलिस सुत्रांन कडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की लॉक डाऊन व कलम 144 च्या अनूशंगाने दि.25 रोजी रात्रीच्या सुमारास फर्दापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे पो.कॉ नारायण खोडे,सचिन केंद्रे,संजय कोळी यांचे पथक फर्दापूर येथील औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गस्त घालीत असतांना येथील हॉटेल न्यू सुरुची मध्ये गर्दी जमली असल्याचे पोलिसांना दिसून आले पोलिसांनी सदरील हॉटेल मध्ये जावून तपासणी केली असता सोशल डिस्टन्स न ठेवता येथील टेबल-खुर्च्यांन वर बसून लोक जेवण करीत असल्याचे दिसले पोलिसांनी हॉटेल चालका कडे अधिक चौकशी केली असता कुणाकडे ही मास्क नसल्याचे व हॉटेल मध्ये हँडवॉश,सॅनेटायझर आदी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली नसल्याचे पोलिसांना दिसून आले दरम्यान या प्रकरणी पो.कॉ नारायण सुरेश खोडे यांच्या फिर्यादी वरुन हॉटेल चालक नितिन रघुनाथ पाटील(रा.फर्दापूर ह.मु जामनेर जि.जळगाव) यांच्या विरूध्द कलम 144 जिल्हाधिकार्याच्या आदेशाचे उल्लंघन साथरोग प्रतिबंधीत कायदा 1897 महाराष्ट्र कोव्हीड 19 नियंत्रण कायद्यानुसार फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे राष्ट्रीय आपत्ती निर्माण झालेली आहे मात्र अश्या स्थितीत ही नफेखोरी साठी हपापलेले काही महाभाग वारंवार कायद्याचे उल्लंघन करतांना दिसत आहे अश्या लोकांन वर पोलिस कारवाई करीत असले तरी पोलिस दलांन समोर ही मनूष्य बळाच्या काही मर्यादा आहेत याबाबीचा विचार करुन महसूल विभागाने ही त्यांची भरारी पथके नेमणून कायद्याचे उल्लंघन करणार्यान विरूध्द कारवाई करीत पोलिसांना साथ दिल्यास ग्रामीण भागात शंभर टक्के लॉक डाऊन चे खर्या अर्थाने पालन होतांना दिसून येईल
Leave a comment