फर्दापूर । वार्ताहर

मोटारसायकल वरुन शेतात जातांना मोटारसायकल चा अपघात होवून मोटारसायकलस्वार शेतकरी जागीच ठार झाला हा अपघात दि.21 मंगळावर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पळसखेडा (ता.सोयगाव)शिवारात घडला असून या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या बाबत पोलिस सुत्रांन कडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की शेतकरी रविंद्र जानकीराम राठोड (वय 32 रा.टिटवी ता.सोयगाव) हे मंगळवारी रात्री मोटारसायकल वरुन शेतात जात असतांना रात्री 8 वाजेच्या सुमारास पळसखेडा शिवारातील गट क्रमांक 33 मधील शेता जवळ त्यांची मोटारसायकल दगडावर आदळून अपघात झाला या अपघातात शेतकरी रविंद्र जानकीराम राठोड जागीच ठार झाले दरम्यान टिटवी चे पोलिस पाटील ज्ञानेश्वर ताराचंद राठोड यांनी घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन या अपघाताची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे याप्रकरणी साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शना वरुन पो.कॉ चेतन ठाकरे हे  पुढील तपास करीत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.