सुदैवाने जिवितहानी टळली ,व्यावस्थापनेचा गलथान पणा
पैठण । वार्ताहर
येथील पैठण औद्योगीक वसाहतीध्ये शालिनी नामक केमिकल कंपनीत अचानक स्फोट होवून पुर्ण बांधकाम कोसळून केमिकल युक्त धुवा हवेत पसरून परिसर केमिकल युक्त झाल्याचे पहावयास मिळाले .हा स्फोट इतका भयानक होता की आजू बाजूला असणा-या बांधकामाच्या भितींला तडे जावून खिडक्याच्या काचा फुटल्याची घटना दि 22 वार बुधवार रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली .दुदैवाने कोणतीस जिवत हानी घडली नाही .
या बाबत अधिक माहीती अशी की ,पैठण औद्योगिक वसाहतीत सद्या लॉकडाऊन असतांनाही जंत केमिकल बनवणारी शालिनी नामक कंपनी रात्रपाळीसाठी सुरू होती .रात्रीची पाळी सकाळी साडे सहा वाजे पर्यंत तिन मजूर काम करत होते .त्यांची शिप संपवून ते मजूर बाहेर पडताच अचानक शालिनी कंपनीत केमिकल साठवून ठेवलेल्या टाकीचा मोठा स्फोट होवून पुर्ण बाधकाम कोसळून छतावरील पत्रे जवळपास पाचशे मिटर पर्यंत उडून केमिकल युक्त जाळ व धुवा आकाशात झेपावला पहता पहाता अग्निने रौद्र रूप धारन केले या केमिकलच्या धव्यामुळे जवळच असणा-या मुधलवाडी गावातील नागरिकांना मळमळ उलट्या झाल्याचे प्रकारही समोर आला आहे .त्यातच जवळच इतर कंपन्याच्या बांधकामाला तडे जावून खिडक्याच्या काचा फुटल्या घटनेची माहिती मिळताच पैठण येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणत विझवली .मात्र काहीकाळ परिसरात केमिकलची दुर्गंधी पसरून नागरिकांना या पासून त्रास झाला .स्थानिक पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेवून परिसरातील कामगारांना बाहेर काढले व श्वान पथकाला पाचारण केले व पाहणी केली यात लाखो रूपयांचे सदरिल कंपनीेेचे नुसकान झाल्याचे समजते. दरम्यान लॉकडाऊनच्या काळातही कंपनी सुरू कशी ठेवली यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून .कंपनी चालवण्यास परवानगी होती की , नाही होती तर केमिकल बवणारी मशिनरी सक्षम नसतांना कामगारा कडून ना दुरूस्त मशिनरीत काम करून घेणे ,म्हणजे कामगारांच्या जिवानिशी खेळणे होय .यात अधिक सखोल चौकशी करून दोषीवर व कंपनिच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकात होत असून पुढील तपास सपोनी अर्चना पाटील या करत आहेत.
Leave a comment