औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या संकटाशी देश आणि राज्य लढत असतांना लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणार्या हजारो लोकांना अन्न पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. अनेक राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. विजय औताडे यांनी मात्र गेल्या महिनाभरापासून सातत्याने तालुक्यातील गरजूंना मदत माध्यमातून नियमित अन्न देण्याचा उपक्रम राबवला आहे. देण्याच्या या कामात अद्याप खंड पडलेला नाही. जोपर्यंत संपुर्णपणे लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत हि मदत दिले जाणार असल्याचे विजय औताडे यांनी लोकप्रश्ननशी बोलतांना सांगितले. लॉकडाऊनच्या काळात एकही गरीब, गरजू व्यक्ती उपाशीपोटी राहाता कामा नाही ग्रामीण भागात कुणी अन्नधान्य, किराणा सामानाचे कीट, अन्नपाकीट तर कुणी अन्नधान्य माध्यमातून मोफत वाटप करत आहे . अन्यधान्य योजनेचा पहिला टप्पा औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आला होता. तत्कालीन माजी उपमहापौर विजय औताडे यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन कष्टकर्यांना लोकांना माध्यमातून दिले जाते. दररोज अडीचशे ते तीनशे गरजू अजूनही या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरू केलेली ही योजना थेट ग्रामीण पातळीवर पोहचली.
लॉकडाऊनच्या काळात संपुर्ण राज्यात दररोज दोन ते तीन हजार लाखाहून अधिक अन्यधान्य वाटप केले जात आहे. औरंगाबदेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वस्तीत गरजूंना देण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. आतापर्यंत म्हणजे महिनाभरात हजाराहून अधिक गरजूंची या माध्यमातून भूक भागवण्यात आली आहे. याशिवाय विजय औताडे यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तांडे, वस्त्यांवर जाऊन मजुर, वीटभट्टी कामगार, झोपडपट्टीत जाऊन गरजूंपर्यंत अन्नधान्य व किराणा सामानाचे कीट देखील पोहचवले आहे. लॉकडाऊनचा कालावधी सुरू असेपर्यंतही मदत अविरतपणे सुरूच ठेवणार असल्याचेही भाजप जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या मूळ बांधा म्हणजे तिचे संघटन गावात पदाधिकारी-बूथ कार्यकर्त्यांचे गाव ते जिल्हा पातळीवर मोठे आहे. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हातील प्रत्येक तालुक्यात मदत कार्य सुरू असून गावातील गरजूंची माहिती कोणाकडे रेशनकार्ड नाही व बाहेर राज्यातील कामगार कोणी आहे का त्याला अन्न भेटत आहे का नसल्यास त्यांना धान्य किंवा दररोज खिचडी वरण पोळी या प्रकारे त्याची अन्नाची गरज पूर्ण होत आहे. गावाकडे जास्त प्रमाणात मास्क उपलब्ध नसल्याने भाजपा पदाधिकारी शहरातून विविध पदाधिकारी व तालुकानिहाय ते मास्क किंवा पांढरे रुमाल देत आहे. परराज्यातून आलेले असल्याकारणास्तव लॉक डाऊन मुळे आज त्यांना काम बंद झाल्यामुळे व त्यांच्या गावी जाणे बंद आहे यामुळे त्यांना काही दिवस राहणासाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची दैनंदिन देखभाल गावातील बूथ कार्यकर्ते करीत आहे.ग्रामीण भागात काही ठिकाणी ग्राम पंचायत निजंतूक फवारणी करत आहे.त्याठिकाणी पदाधिकारी वर्ग आपले फळबागेचे देऊन सामाजिक कार्यात भाग घेत आहे.भारतीय जनता पार्टीच्या सध्या जिल्हातील याठिकाणी पक्षाचे जे गावस्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे ते सर्व जण सामाजिक कार्य करत आहे.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यभरात गाव,मंडळ (तालुका) जिल्हास्तरावर पक्षाकडून फ्री मास्क व सँनिटायझर वाटप, गावात वार्डात निर्जंतुक फवारणी, निराधार व बेघर लोकांना निवास व्यवस्था करणे, पक्षाच्या माध्यमातू औरंगाबाद कोरोनाच्या लॉकडाउन संपे पर्यंत सुरू राहणार आहे.माघील काही दिवस केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे खा.भागवत कराड, आ.हरिभाऊ बागडे नाना,यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात सर्व म्हणजेच मदत कार्य सर्व तालुक्यात मदत कार्य सुरू असून जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर इंगळे,विकास नरोडे सोमनाथ जाधव,अनिल हिरडे ,दिनेश शेळके,बाबासाहेब वेताळ ,गणेश हरणे ,रामेश्वर ढमाले एकनाथ निकम ,प्रविन मते. के.आर सहाने अतिश तिडके शुभम पाटील योगेश सुर्यवंशी आबा गोविद कान्हिरे,सदीप चव्हान , सुनिल साबळे ,प्रदीप राऊत, शिवबच्चन यादव ,यांच्या माध्यमातून औरंगाबाद ग्रामीण भाजपाच्या वतीने आता पर्यंत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाभरात पूर्ण पदाधिकारी-बूथ कार्यकर्ता-जिल्हा पदाधिकारी आपल्या परीने कार्य करीत आहे. अविरतपणे सुरूच ठेवणार असल्याचेही भाजप जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले यांनी सांगितले.
Leave a comment