परतुर प्रतिनिधी/
लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या 40 मोटारसायकलिवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दोन दिवसात 40 मोटारसायकली जप्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
अनेकदा सूचना देण्यात येऊन ही लॉकडाऊन असताना काही जण विशेषतः तरुण परतुर शहरात काम नसताना फिरताना दिसत होते, पोलिसांनी दोन दिवसाखाली अशा 26 मोटारसायकली वर कारवाई करून त्या जप्त केल्या.काहींना दंड आकारून सोडण्यात आले परन्तु तरीही अत्यावश्यक कामाशिवाय अनेकजण रस्त्यावर फिरतांना आढळून येत होते.आज परत पोलिसांनी शहरातील काही भागात 14 मोटारसायकल वर कारवाई करत त्या पोलीस स्टेशनमध्ये लावल्याने खळबळ उडाली. विशेष पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जाधव,गुप्त शाखेचे गुंजकर, पोलिस कर्मचारी कोकने, राठोड ,होनडे यांनी ही कारवाई केली. यापुढे शहरात अत्यावश्यक कामाशिवाय कोणी मोटारसायकल वर फिरताना आढळला तर त्याच्यावर वाहन जप्तीशिवाय गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पीएसआय जाधव यांनी सांगितले आहे.
Leave a comment