बदनापूर/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदीदरम्यान प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी सूट दिलेली असताना अन्याय पध्दतीने बदनापूर पोलीस निरीक्षक मारोती खेडकर सह कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना वाहन पासेस देत नसल्यामुळे पोलीसांमुळे बदनापूर येथून प्रकाशित होणारे अनेक दैनिके व साप्ताहिके बंद पडले असल्याची तक्रार प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष इलियास खान पठाण यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह आदींकडे तक्रार केलेली असून, याबाबत मुख्यमंत्री यांनी ता. १ एप्रिल २०२० रात्री ११.१५ च्या दरम्यान जालना जिल्हाधिकारी यांना मेल पाठवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बदनापूर पोलिसांनी मुददामहून दैनिक तुफान लोकशाहीच्या प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना पासेस दिलेल्या नाही, त्यांनी एकाप्रकारे अधिकाराचा गैरवापर करून वृत्तपत्रांना अडथळा निर्माण केल्याने अनेक वृत्तपत्रे बंद पाडल्यामुळे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या विरुद्ध भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जालना जिल्हाधिकारी यांचे आदेश व प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दिलेल्या निर्णयाचे अवमानना केल्यामुळे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष इलियासखान यांनी केली असून, एकाप्रकारे स्वतः ला पोलीस निरीक्षक मारोती खेडकर हे जिल्हाधिकारी यांच्या पेक्षा मोठे समजत होते का? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून वृत्तपत्र घोषित केले आहे. लॉकडाऊन व संचारबंदीतून पत्रकार, वृत्तपत्र वितरक व वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना सूट देण्यात आलेली असतांनाही संचारबंदीमध्ये संचार करण्यासाठी पोलिस विभागाकडून परवाना देण्यात येत असून, पाससाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. परंतु बदनापूर पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी दंडेलशाहीचा वापर करून दैनिक तुफान लोकशाहीचे काम करणारे कर्मचारी व पत्रकारांना ऑनलाईन पास मिळविण्यासाठी रीतसर अर्ज सादर करून ही परंतु पोलिस निरीक्षक मारोती खेडकर यांनी दंडेलशाहीचा वापर करून जाणूनबुजून हे अर्ज रिजेक्ट म्हणजे नामंजूर केले. अनेकवेळा अर्ज करूनही नामंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे या दैनिकाच्या प्रकाशानावर परिणाम होत आहे. या ठिकाणी दोन ते तीन दैनिके व चार ते पाच साप्ताहिकाचे काम चालते. पोलिस निरीक्षक मारोती खेडकर सह कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ही सर्व प्रकाशने बंद पडली आहे. याबाबत प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष इलियासखान यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी पोलिस निरीक्षक मारोती खेडकर सह आदी पोलीस कर्मचारी अडथळा करत असल्याची बाब लक्षात आणून दिली असता, मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आलेले असून, याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. पोलिस निरीक्षक मारोती खेडकर सह आदी कर्मचाऱ्यांच्या दंडेलशाही मुळे अनेक वृत्तपत्राचे प्रकाशने व पत्रकारांची गळचेपी केली व भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जालना जिल्हाधिकारी यांचे आदेश व प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दिलेल्या निर्णयाचे अवमानना केल्यामुळे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष इलियासखान यांनी केली आहे.
Leave a comment