प्रतिनिधी

संपूर्ण देशभरात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव भयंकर स्वरूप धारण करत असून संपूर्ण देशभरातील वातावरण भयभीत झाले आहे असे असताना भारतामध्ये मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार व राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी जनसामान्यांमध्ये कोरणा बाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असून संचार बंदीमुळे ज्या गोरगरीब कष्टकरी कामगार लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेऊन आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपला दोन महिन्याचा पगार गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या फूड पॅकेज साठी दिला आहे

फूल पॅकेजमध्ये बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून शेव चिवडा व बुंदी चे पॅकेट तयार केले जात असून त्या फूड पॅकेजचे वितरण मतदारसंघातील सर्व गावांमध्ये केले जाणार आहे ज्या गावांमध्ये अत्यंत गोरगरीब लोक आहेत आणि ज्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे संचारबंदी मुळे सर्व कामधंदे बंद असून शहरी भागातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर झाले आहे आणि त्यामुळे दिवसभर काम केले तर संध्याकाळी चुलते अशा अत्यंत हलाखीची परिस्थिती असणाऱ्या कुटुंबाला त्या कुटुंबातील व्यक्तींना मदतीचा हात म्हणून बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून फोटो पॅकेज दिले जाणार आहे त्यासाठी बबनराव लोणीकर यांनी आपला दोन महिन्याचा पगार अर्थात चार लाख 60 हजार रुपये फुल पॅकेज साठी दिले आहेत गोरगरिबांच्या जेवणासाठी तयार करण्यात येणाऱ्या फूड पॅकेज साठी दोन महिन्याचा पगार देणारे महाराष्ट्रातील पहिले आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव घेता येईल

आपल्या दोन महिन्याच्या पगारातील एक महिन्याचा पगार मंठा व नेर सेवली साठी दिला जाणार आहे तर एक महिन्याचा पगार परतूर तालुक्यासाठी दिला जाणार आहे अशा पद्धतीने दोन महिन्याचा चार लाख 60 हजार रुपये फुड पॅकेत साठी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत यापुढे पॅकेजच्या माध्यमातून मागील तीन दिवसांपासून शेव चिवडा आणि बुंदी बनवण्याचे काम अविरतपणे सुरू असून मोठ्या प्रमाणात फूड पॅकेजेस तयार करण्यात आले आहेत या तयार झालेल्या पॅकेजेस ची स्वतः आमदार लोणीकर यांनी पाहणी केली असून आवश्यकता भासल्यास अजूनही जास्तीत जास्त पॅकेजेस तयार करण्याच्या सूचना यावेळी लोणीकर यांनी दिल्या परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदार संघात साधारणतः 25000 कुटुंबापर्यंत हे फूड पॅकेज पोहोचणार असून लोणीकर यांच्या वतीने हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांचा विचार केला असता अद्याप पर्यंत मतदारसंघातील किंवा मतदारसंघ बाहेरील ज्या लोकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा लोकांच्या जेवणासाठी पुढाकार घेणारे बबनराव लोणीकर एकमेव आमदार आहेत असेच म्हणावे लागेल

आतापर्यंत संपूर्ण मतदार संघासाठी साधारणतः 25 क्विंटल साखर काढून बुद्धि तयार करण्यात आली असून त्या तुलनेत शेव चिवडा देखील बनवण्यात आला आहे बुंदी व शिव चिवड्याचे प्रत्येकी एक किलो प्रमाणे पॅकेट्स तयार करण्यात आले असून परतूर व मंठा येथे प्राथमिक स्वरूपात आमदार लोणीकर यांच्या हस्ते वितरणाला सुरुवात होणार आहे त्यानंतर वितरण व्यवस्थेमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत हे पॅकेट्स पोहोचवले जाणार असून गावातील गरजूंना त्यासंबंधित कार्यकर्त्या मार्फत पॅकेट पोहोचवले जाणार आहेत यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोरूना प्रादुर्भावामुळे घालून दिलेल्या सर्व नियम व अटी चे पालन केले जाणार असून सोशल डिस्टन्स पाळत हे वितरण व्यवस्था पार पाडली जाणार आहे

याबाबत आमदार लोणीकर यांना विचारले असता आपण समाजाचे देणे लागतो समाजाने लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपल्यावरती दिली असून ती जबाबदारी पार पाडत ज्या लोकांनी आपल्यावरती एवढा प्रचंड विश्वास दाखवला त्या लोकांचा सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे आज संपूर्ण देशात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भावामुळे प्रचंड दहशत पसरली असून शहरी भागातून अनेकांनी स्थलांतर करुन गावाकडे धाव घेतली आहे संचारबंदी मुळे गावातील व शहरातील सर्व व्यवसाय व कामधंदे बंद पडले आहेत त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे एक मदतीचा हात म्हणून या दुःखद प्रसंगी आपण लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे या लोकांच्या सोबत उभे राहिले पाहिजे असे वाटले म्हणून दोन महिन्याचा पगार या फूड पॅकेजसाठी देऊन सर्वसामान्य कामगार कष्टकरी गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहे असे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.