माजलगाव -उमेश जेथलिया
जिल्हाधिकारी रेखावार यांनी कोविड 19 चा प्रदूरभाव रोखण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली असताना माजलगाव न प प्रशासन ने मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून आदेशा येऊन 4 दिवस होत असून ही न प ने एकाही गैरप्रकारां स दंड केले नसल्याने न प च्या भूमिकेवर च संशय निर्माण होत आहे.तर बेफिकीर नागरिकांवर प्रशासनाची कृपा कशामुळे आहे.?कोरोना ची लागण माजलगाव करा ना व्हावी आशीतर प्रशासनाची इच्छा नाही ना असाही प्रश्न पडत आहे
परळी व अंबाजोगाई न प ने मास्क न लावणारे,सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे मोटर सायकल आणणाऱ्या वर वयोवृद्धव्यक्ती बालक याना घेऊनफिरणरावर 200 ते 2000 रु चा दंड जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून वसूल केला मात्र माजलगाव नगरपरिषद व तहसील प्रशासन मात्र सरळ सरळ कानाडोळा करत असून कोरोना प्रधुर्भाव होण्यास अप्रत्यक्ष सहकार्य करत आहेत .शहरात नागरिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत असताना प्रशासन तोंडवर बोट ठेऊन असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातल्यामुळे केंद्र व राज्य सरकार कोरोनवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी रेखावर यांनी बीड जिल्ह्यात ठोस पावले उचलत असून काही बेमुर्त आणि बेफिकीर नागरिक जाणीव पूर्वक शिस्त पाळत नसून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत तर नगर पालिका,ग्रामपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत .आदेश न पाळणारणा दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु आज पर्यंत नगर पालिकेने तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरणार्यावर कसलीच कारवाई केली नाही असे निदर्शनास आले आहे. याच्या वरून असे दिसते की जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे.
नगर पालिका हद्दीतील टवाळखोर लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तीना सोबत घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई व दंड न आकारता नगर पालिका बग्याची भूमिका घेत आहेत. जर कोणी संचारबंदी चे उल्लंघन करीत असेल तर त्यांच्या वर दंड आकारून कारवाई करणे आवश्यक आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.