बीड । वार्ताहर
मानसिक तणावग्रस्त, निराशाग्रस्त अवस्थेतून कौटुंबिक हिंसाचार घडून कोणाही व्यक्तीला जिल्ह्यात त्रास होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा पोलिसांकडून बीड जिल्ह्यातील नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, कौटुंबिक हिंसाचाराला आळा बसावा,मानसिक निराशाग्रस्त परिस्थितीतून कोणत्याही प्रकारची कौटुंबिक हिंसा होणार नाही. यासाठी तात्काळ मदत, प्रतिसाद आणि समुपदेशन घडवून आणण्यासाठी तीन विविध सेलची स्थापना करण्यात आली आहे.
बीड पोलिसांनी या कालावधीत मानसिक तणावातून व निराशाग्रस्त अवस्थेतून कौटुंबिक हिंसाचारच्या घटनांना तात्काळ मदत देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस हेल्पलाईन कक्ष,स्थापन केला आहे. या पोलीस हेल्पलाईन कक्षामध्ये तीन अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या तीन अधिकार्‍यांकडे वेगवेगळे हेल्पलाइन विभाग नेमण्यात देण्यात आले आहेत. सहाय्यक निरीक्षक सुषमा पवार यांच्याकडे महिला हेल्पलाइन सेलची तर उपनिरीक्षक सरस्वती राठोड यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन सेलची जबाबदारी दिली गेली आहे. याशिवाय उपनिरीक्षक राणी सानप यांच्याकडे ‘बालकांसाठी हेल्पलाइन सेल’चे काम सोपवण्यात आले आहे.
या तीनही अधिकार्‍यांच्या नंबरवर जिल्ह्यातील नागरिकांनी संपर्क करावा तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथील 1091 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. या सर्व नंबर वर येणार्‍या कॉल्सला तात्काळ मदत देण्यात येईल.त्यासाठी हे संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना फोन करून पीडिताच्या पत्त्यावर त्यांना मदत देण्यासाठी, त्यांना प्रतिसाद देण्यासाठी,त्यांचे समुपदेशन घडवून आणण्यासाठी एक टीम पाठवली जाईल.

कुटूंबातील सदस्यांशी प्रेमाने रहा
कोरोनाच्या बिकट स्थितीत सर्व नागरिकांना एकत्रितपणे लढा द्यायचा आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आपण कुटूंबातील सदस्यांना चांगली वागणूक द्यावी. कोणत्याही प्रकारची कौटुंबिक हिंसा आपण करणार नाही अशा प्रकारची आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीला साजेसं असलेलं वागणं आपण सर्वांनी करायचं आहे.आणि अशा प्रकारचं कोणीही एखाद्याला त्रास देत असतील, त्रास होत असेल तर त्यासाठी बीड पोलिस आपल्या सेवेत दक्ष आहे, बीड पोलिसांचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.